शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय करण्याच्या हक्कावर मद्यविक्रेते दावा करू शकत नाहीत

By admin | Updated: March 21, 2017 03:47 IST

राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ अंतर्गत आपल्याला व्यवसाय करण्याचा हक्क आहे, असा दावा मद्यविक्रेते करू शकत नाहीत, असा निर्वाळा

मुंबई : राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ अंतर्गत आपल्याला व्यवसाय करण्याचा हक्क आहे, असा दावा मद्यविक्रेते करू शकत नाहीत, असा निर्वाळा सोमवारी उच्च न्यायालयाने दिला. राज्य सरकारला या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.ताडी-माडी विक्री केंद्र चालवण्यासंदर्भात राज्य सरकारने २०१६मध्ये काढलेल्या अधिसूचनेला काही ताडी-माडी विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. २०१६च्या राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, ताडी-माडी विक्री केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीची ताडीची १ हजार झाडे असणे बंधनकारक आहे. तसेच तो ज्या भागाचा रहिवासी आहे, त्याच भागातील ताडी-माडी विक्री केंद्र चालवण्याचा परवाना देण्यात येईल. या अधिसूचनेमुळे परवानाधारकांना तालुक्याबाहेर ताडी-माडी विकण्यावर निर्बंध आला. ज्यांच्याकडे आधीपासूनच परवाना आहे, त्यांचे म्हणणे लक्षात न घेताच राज्य सरकारने ताडी-माडी विक्री केंद्रांचा लिलाव केला. राज्य सरकारची ही अधिसूचना बेकायदा व मनमानी आहे. त्यामुळे ही अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी ताडी-माडी विक्रेत्यांनी याचिकांद्वारे केली आहे. या याचिकांवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे होती.राज्य सरकारचा हा मनमानी कारभार असून, ताडी-माडी विक्रेत्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यात आले आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ अंतर्गत नागरिकांना त्यांना हवा तो व्यवसाय करण्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे. मात्र राज्य सरकार या हक्कावरच गदा आणत आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. तर ही अधिसूचना जनहितार्थ काढल्याचे राज्य सरकारने खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)