शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शरीरावर व्रण, विषाचा दर्प

By admin | Updated: September 12, 2014 00:50 IST

सोनाली अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत होती. तिच्या गळ्यावर, खांद्यावर, छातीजवळ आणि डाव्या हातावर निळसर डाग (व्रण) टिपले दाम्पत्याला दिसले. सोनालीला काय झाले, असे त्यांनी जावयाकडे विचारले असता,

नागपूर : सोनाली अतिदक्षता विभागात बेशुद्धावस्थेत होती. तिच्या गळ्यावर, खांद्यावर, छातीजवळ आणि डाव्या हातावर निळसर डाग (व्रण) टिपले दाम्पत्याला दिसले. सोनालीला काय झाले, असे त्यांनी जावयाकडे विचारले असता, सोनाली सारख्या ओकाऱ्या करीत होती, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचे अमोलने सांगितले. तिच्या नाका-तोंडातून विषाचा उग्र दर्प येत असल्यामुळे तिने विष घेतले असावे, असा संशय सोनालीच्या आईवडिलांना आला. दरम्यान, १० सप्टेंबरच्या सकाळी ५.१५ ला डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केले. लग्नाला तीन महिने पूर्ण व्हायचे असतानाच मुलीचा असा अंत झाल्यामुळे टिपले परिवाराला जबर मानसिक धक्का बसला.विष पाजून ठार मारल्याचा आरोप जावई अमोल याच्याकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्यामुळे त्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी सोनालीला मारहाण करून, विष पाजून ठार मारले असावे, असा संशय सोनालीच्या वडिलांना आला. लकडगंज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून शंकरराव टिपले यांनी जावई अमोल बोरकर, त्याचा भाऊ राधेश्याम आणि आई रेखाबाई पांडुरंग बोरकर या तिघांनी संगनमत करून सोनालीला मारहाण केली आणि विष पाजून ठार मारले, असे तक्रारीत म्हटले आहे. यावरून लकडगंजचे पीएसआय आनल दास यांनी कलम ४९८ (अ), ३२८, ३०४ (ब), ३४ अन्वये गुन्हे उपरोक्त तिघांवर गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी) आईला अखेरचे निमंत्रण ६ सप्टेंबरला सोनालीकडे कार्यक्रम होता. त्याची खरेदी करण्यासाठी ती भांडेप्लॉटकडे आली होती. यावेळी ती आईच्या घरी आली. आज (६ सप्टेंबर) आमच्याकडे कार्यक्रम आहे. तुम्ही सर्वजण या, असे निमंत्रण तिने आई कमलाबार्इंना दिले. प्रकृती चांगली नसल्यामुळे कमलाबाई तिच्याकडे जाऊ शकली नाही. तीन दिवसानंतर कमलाबाईला दुसरा निरोप मिळाला. धावपळ करीत त्या पतीसोबत रुग्णालयात पोहचल्या. यावेळी सोनाली मृत्युशय्येवर होती. तिच्याशी संवाद करण्याचीही कमलाबार्इंना संधी मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी (१० सप्टेंबर) सोनालीचा मृत्यू झाला. तिने ६ सप्टेंबरला आपल्या आईला दिलेले निमंत्रण अखेरचे ठरले. मुलीच्या निमंत्रणाला मान दिला नाही, याचे शल्य कमलाबाई यांना आता आयुष्यभर बोचणार आहे.