शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे ट्रॅकवरील गुन्ह्यांना ब्रेक

By admin | Updated: May 18, 2016 02:35 IST

मुंबई शहर व उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मुद्देमाल चोरीला जातो

मुंबई : मुंबई शहर व उपनगरीय रेल्वेमार्गावरून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मुद्देमाल चोरीला जातो आणि त्यानंतर सतर्क नसलेल्या प्रवाशांना आठवण होते ती रेल्वे पोलिसांची (जीआरपी). एखादी महत्त्वाची वस्तू चोरीला गेल्यानंतर प्रवाशांकडून रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाते आणि त्याची दखल घेत पोलिसांकडून तत्काळ तपास करून गुन्हेगारांना जेरबंद केले जाते. रेल्वेतील गुन्हेगारीला रेल्वे पोलिसांकडून गेल्या काही वर्षांत ब्रेक लावण्यात येत आहे. २0१४ (जानेवारी ते डिसेंबर) ते २0१६ (जानेवारी ते एप्रिल) या काळात रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) केलेल्या कारवाईत तब्बल ६९0 अट्टल गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ३ कोटी ७ लाख ३१२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. २0१५ सर्वाधिक गुन्हेगारांना अटक

२0१५मध्ये विविध गुन्ह्यांत ३१९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. २0१५च्या जानेवारीत ३0, एप्रिल महिन्यात ४२ तर मे, जून, जुलै आणि सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी २८ गुन्हेगारांची धरपकड केली आहे. २0१६च्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत प्रत्येकी ३0 तर एप्रिल महिन्यात २९ गुन्हेगारांना पकडले आहे.रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या चोऱ्या आणि अन्य गुन्ह्यांना आमच्याकडून आळा घातला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना आम्ही केल्या आहेत. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, गुन्हेगारांनाही पकडण्यात यश आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. - विनोद चव्हाण, लोहमार्ग पोलीस, क्राइम ब्रँच- वरिष्ठ पोलीस निरीक्षक