शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिष्टाचार मोडून कुलगुरू पोलीस आयुक्तालयात

By admin | Updated: May 22, 2017 20:19 IST

राज्यपालांचे थेट प्रतिनिधी तसेच उपराज्यपालांचा दर्जा असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - राज्यपालांचे थेट प्रतिनिधी तसेच उपराज्यपालांचा दर्जा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी  सर्व शिष्टाचार (प्रोटोकॉल) बाजूला सारून सोमवारी दुपारी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची त्यांनी भेट घेतली. साई इन्स्टिट्यूटच्या २७ विद्यार्थ्यांना नगरसेवकाच्या घरी उत्तरपत्रिका सोडविताना पोलिसांनी पकडल्याच्या पार्श्वभूमीवर कुलगुरूंनी ही भेट घेतल्याने खळबळ उडाली.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सध्या चौका येथील साई इन्स्टिट्यूटच्या अभियांत्रिकी परीक्षा घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. १७ मे रोजी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सुरेवाडीचे शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरावर छापा मारून तेथे अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका लिहित बसलेल्या २७ विद्यार्थ्यांसह, प्राध्यापक, संस्थाचालक, प्राचार्य अशा ३३ जणांना अटक केली होती. या प्रकाराने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. परिणामी देशपातळीवर विद्यापीठाची बदनामी झाली. घटनेच्या काळात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे बाहेरगावी होते. दोन दिवसांपूर्वी ते विद्यापीठात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिगंबर नेटके यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली.
 
गुन्हेशाखेच्या पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी प्रा. नेटके यांच्यासह विद्यापीठ परीक्षा विभागाशी संबंधित काही लोकांची चौकशी केली. या पार्श्वभूमीवर कुलगुरू  चोपडे यांनी पदाचा प्रोटोकॉल बाजूला सारून पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. पुष्पगुच्छ घेऊन कुलगुरू आणि नेटके यांनी दुपारी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेतली. आयुक्तांशी त्यांनी २० मिनिटे चर्चा केली. यावेळी तेथे उपायुक्त, सहायक आयुक्त आणि तपास अधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांना भेटल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले असता, त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे नमूद करीत अधिक बोलण्यास नकार दिला.