शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पुण्यात ब्रेकफेल पीएमपी थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 20:15 IST

ब्रेकफेल झालेली पीएमपी झाडाला धडकून रस्त्याच्या कडेला पार्किंग मध्ये लावलेल्या चारचाकीवर आदळली. वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर भोसले आर्केड समोर ही दुघटना घडली

ऑनलाइन लोकमतपुणे : ब्रेकफेल झालेली पीएमपी झाडाला धडकून रस्त्याच्या कडेला पार्किंग मध्ये लावलेल्या चारचाकीवर आदळली. वर्दळीच्या जंगली महाराज रस्त्यावर भोसले आर्केड समोर ही दुघटना घडली. हा प्रकार घडल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या गाडी मध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, गाडी आदळल्याने गाडीचा चालक जखमी झाला आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावर वाहनांच्या मोठया रांगला लागल्या होत्या. पीएमपीची बस क्रमांक एम.एच १२ एच बी २५९ ही गाडी गुडलक चौकातून डेक्कन कडे जात असताना प्रयाग हॉस्पीटल जवळ गाडीचा ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर गाडी बँक आॅफ महाराष्ट्राच्या बाजून घेतल्यास पुढे सिग्नलला इतर वाहने थांबली असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन चालकाने गाडी तशीच पुढे भोसले आर्केडच्या समोर पदपथावर घातली. मात्र, त्यानंतरही गाडी न थांबल्याने ही गाडी थेट रस्ता ओलांडून झेब्रा क्रॉसिंगवरून समोरील बाजूस असलेल्या पार्किंग केलेल्या एमएच १२ केजे ६४२२ या काळ््या रंगाच्या एका कारवर आदळून नंतर झाडाला आदळली,सुदैवाने या गाडीमध्ये कोणीही नसल्याने मोठा अपघात टळला. त्यानंतर ही गाडी जंगली महाराज रस्त्यावर पूर्णपणे आडवी असल्याने या रस्त्यांवर काही मिनिटात वाहनांच्या मोठया रांगा लागल्याने चांगलीच वाहतूक कोंडी झाली.---...तर गेले असते अनेक जीव भोसले आर्केड समोर ज्या ठिकाणी झाडावर ही बस आदळली त्या ठिकाणी सिग्नल तसेच पादचारा-यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आहे. या सिग्नलवर सायंकाळी पाच नंतर दुचाकी वाहने तसेच रस्ता ओलांडणा-यांच्या मोठया रांगा असतात. ज्या वेळी ही बस दुभाजक ओलांडून पुढे गेली. त्यावेळी सिग्नल सुटल्याने जवळपास सर्वच वाहने पुढे गेलेली होती. त्यामुळे एकही दुचाकी अथवा इतर गाडीला त्याची धडक बसली नाही. त्यातच रोजच्या वर्दळीपेक्षा आज वर्दळ कमी असल्याने मोठी दुघर्टना टळली आहे. अन्यथा वाहने सिग्नलला असताना ही बस रस्त्यावर घुसली असती तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले असते. तसेच ज्या कारला या बसने धडक दिली. त्या कार मधील व्यक्तीही गाडी रस्त्याच्या कडेला लावून समोर शॉपींगसाठी गेलेले होते. त्यामुळे त्यांचाही जीव वाचला.