शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाला ‘ब्रेक’

By admin | Updated: January 7, 2015 01:29 IST

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या १ हजार ३५१ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली

यदु जोशी - मुंबईजलसंधारण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या १ हजार ३५१ कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली असून, आता या कामांची तांत्रिक व्यवहार्यता तपासूनच ती हाती घेण्यात येतील, अशी भूमिका जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतली आहे. जलसंपदा विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती आता या कामांची शाहनिशा करेल. तांत्रिक बाजू आणि व्यवहार्यता तपासून बघेल आणि शासनाला अहवाल देईल. त्यानंतर ही कामे घ्यायची की नाही आणि घ्यायची तर कधी घ्यायची, या बाबतचा क्रम निश्चित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.१ हजार ३५१ कोटी रुपयांच्या या कामांमध्ये मुख्यत्वे सिमेंट नाला बंधारे, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण बंधारे, पाझर तलाव बांधणे आदी कामांचा समावेश आहे. ही कामे मुख्यत्वे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील आहेत. मात्र निविदा निघालेली आणि कार्यादेश जारी करण्यात आलेली कामे थांबविली जाणार नाहीत.आघाडी सरकारच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तत्कालीन जलसंधारण मंत्री नितीन राऊत आणि जलसंधारण मंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डी. एम. लिहितकर यांनी ही कामे मंजूर करण्यावर भर दिला होता. तथापि, आधी या विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज आणि नंतरचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी कामांबाबत अव्यवहार्य असल्याची भूमिका घेतल्याने विभागांतर्गत मतभेद उघड झाले होते. एकाचवेळी हजार कोटींपेक्षा अधिकची कामे घेतल्याने राज्याच्या तिजोरीवर बोजा पडेल आणि जलसंधारण मंडळाचे मोठे दायित्व निर्माण होईल, असे कामांना विरोध करणाऱ्यांची भूमिका होती. तर दुसरीकडे जलसंधारण मंडळाला राज्य शासन दरवर्षी ४०० कोटी रुपये देत असते. मात्र सन २००० ते २००५ या काळात त्यातील केवळ १०६ कोटी रुपये देण्यात आले.च्लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी कामांना मंजुरी दिली होती.च्या विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज आणि नंतरचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी एवढी मोठी कामे एकाचवेळी घेणे अव्यवहार्य असल्याची भूमिका घेतल्याने विभागांतर्गत मतभेद उघड झाले होते.