शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अवास्तव बांधकामांना ब्रेक

By admin | Updated: July 23, 2014 01:00 IST

उपलब्ध जागेचा योग्य वापर न करता नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविणे आता सरकारी कार्यालयांना शक्य होणार नाही. कार्यालयात खरंच जागेची चणचण आहे हे पटवून दिल्यावरच त्यांना

जागेचा योग्य वापर: द्यावे लागणार प्रमाणपत्रचंद्रशेखर बोबडे - नागपूरउपलब्ध जागेचा योग्य वापर न करता नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविणे आता सरकारी कार्यालयांना शक्य होणार नाही. कार्यालयात खरंच जागेची चणचण आहे हे पटवून दिल्यावरच त्यांना विस्तारीकरणासाठी किंवा नवीन इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने यासंदर्भात ८ जुलैला परिपत्रक जारी केले असून शासकीय इमारतींचा विस्तार किंवा नवीन कार्यालयांचे बांधकाम याबाबत नवी नियमावली जारी केली आहे. त्याचे काटेकोर पालन झाल्यास इमारत बांधकामावर होणाऱ्या अवास्तव खर्चाला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.शासकीय कार्यालयांची दुरुस्ती, विस्तार आणि नवीन इमारतींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते. त्यासाठी संबंधित कार्यालयांकडून बांधकाम विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो व बांधकामासाठी आग्रहही धरला जातो. अनेक वेळा गरज नसताना प्रस्ताव पाठविले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यातूनच नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे, असे राज्याचे मुख्य सचिव ज.स. सहारिया यांनी यासंदर्भात पाठविलेल्या शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. हे पत्रक सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.कार्यालयात उपलब्ध असलेल्या जागेचा योग्य वापर केला जात नाही. अनेक कार्यालयात बहुतांश जागा मोडके फर्निचर ठेवण्यासाठी वापरली जाते. दैनंदिन वापरात नसल्याने काही कार्यालयातील खोल्या कायम बंद राहतात व त्यामुळे त्या दुर्लक्षित राहतात. पण दुसरीकडे नवीन कार्यालयासाठी प्रस्ताव पाठविले जातात, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.नवीन नियमावलीनुसार यापूर्वी ज्या शहरातून नवीन बांधकामासाठी प्रस्ताव आले असतील त्यांना आता त्यांच्या कार्यालयातील उपलब्ध जागेचा कसा वापर करण्यात आला आणि वापरण्यासाठी जागा शिल्लक नाही याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित विभागाच्या सचिवांना प्रादेशिक विभागप्रमुखांकडून घ्यावे लागेल. तसे न केल्यास प्रस्ताव नाकारण्यात येणार आहे. नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत अनेक कार्यालये सध्या रिकामी आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील मनरेगाचे कार्यालय प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाल्याने तेथील जागा शिल्लक आहे. याच कार्यालयातील अनेक गाळे बंद आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मूळ इमारतीत जागा अपुरी असली तरी परिसरात असलेल्या इतर विभागांत मात्र जागेचा योग्य उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)