शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला ब्रेक

By admin | Updated: November 30, 2015 02:55 IST

केंद्र सरकार ‘दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना’ सुरू करणार आहे. त्यामुळे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या निधीला ‘ब्रेक’ लागला आहे

भीमगोंडा देसाई ,  कोल्हापूरकेंद्र सरकार ‘दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना’ सुरू करणार आहे. त्यामुळे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या निधीला ‘ब्रेक’ लागला आहे. प्रशिक्षण संस्थांना देय असलेले ५० लाख रुपये मिळावेत, यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, निधीच मिळाला नसल्यामुळे सर्व उपक्रम बंद आहेत.दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी २०१३-१४ पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी केंद्र सरकारकडून ७५ टक्के, तर राज्य शासनाकडून २५ टक्के निधी दिला जात होता. योजनेतील ‘एक कुटुंब, एक नोकरी’ या उपक्रमातून आठवी पास-नापास, आयटीआय, बारावी पास-नापास विद्यार्थ्यांना निवडलेल्या ट्रेंडचे ३० ते ४५ दिवसांपर्यंत तालुकास्तरावरच मोफत प्रशिक्षण दिले जात होते. प्रशिक्षित बेरोजगारांना विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावून मुलाखतीद्वारे नोकरी दिली जात होती.सन २०१४-१५ वर्षात १८ ते ३५ या वयोगटांतील दारिद्र्यरेषेखालील पाच हजार पात्र बेरोजगारांना नोकरी देण्याचे नियोजन केले. प्रत्येक ग्रामपंचायतीने कमीत कमी दहा दारिद्र्यरेषेखालील बेरोजगारांचे अर्ज घेतले. त्यानुसार तालुकानिहाय उद्दिष्ट्य देऊन सुमारे २५ हजार ९०० अर्ज संकलित केले. चांगला प्रतिसाद मिळाल्याने पाच हजार बेरोजगारांना नोकरी देण्याचे नियोजन केले. पात्र बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्'ातील ११ स्वयंसेवी संस्थांची निवड केली. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना प्रशिक्षणही देण्यात आले; परंतु, या आर्थिक वर्षात निधी आला नाही. त्यामुळे प्रशिक्षणही अर्धवट राहिले. प्रशिक्षण दिलेल्या संस्थांना ५० लाख रुपये देय आहे. संस्थाचालक प्रशिक्षण दिलेल्यांचे पैसे कधी मिळणार याच्या, तर निवडलेले बेरोजगार नोकरी कधी मिळणार, याच्या प्रतीक्षेत आहेत.