शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
2
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
3
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
4
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
5
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
6
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
7
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
8
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
9
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
10
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
11
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
12
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
13
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
14
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
15
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
16
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
17
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
18
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
19
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
20
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू

बलात्काऱ्यांना दिसेल तिथेच फोडून काढा - अनुराधा पौडवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 20:17 IST

बलात्काऱ्यांना दिसेल तिथेच फोडून काढा, अशी अत्यंत संतप्त भावना ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली आहे

पॉर्न साईट्सवरही बंदीची मागणीमुंबई : बलात्काऱ्यांना दिसेल तिथेच फोडून काढा, अशी अत्यंत संतप्त भावना ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगरमधील कोपर्डी घटनेविषयी मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पौडवाल बोलत होत्या.ह्यबलात्काऱ्यांचा सोक्षमोक्ष जिथल्या तिथेच लावाह्ण, असेही पौडवाल उद्वेगाने म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, बलात्कार केल्यावर लोक आपले हात-पाय तोडतील, अशी जरब बलात्काऱ्यांमध्ये बसायला हवी. त्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या कायद्यामुळे सुमारे अर्धे आरोपी सुटतात, तर बहुतेक आरोपी वयोवृद्ध होऊन मरण पावतात. मात्र त्यांना शिक्षा काही होत नाही. त्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नाही.

परिणामी अरब देशांप्रमाणे बलात्कारसारख्या गंभीर घटनांमध्ये कडक शिक्षांची तरतूद केल्यास नक्कीच बलात्काऱ्यांमध्ये कायद्याचा धाक राहील. कोपर्डी येथील घटनेनंतर विभागातील मुलींना शाळेत जाण्याचीही भीती वाटत आहेत. त्या मुलींसाठी भैय्यूजी महाराज यांच्या इंदौर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्टच्या वतीने पौडवाल यांनी ह्यसूर्योदय कुहू कन्याधन सुरक्षा योजनेह्णअंतर्गत चार स्कूल बस सुरू करण्याची घोषणा केली.

कोपर्डी भागात २ आणि बीड जिल्ह्यात २ अशा एकूण चार स्कूल बस ट्रस्टकडून दिल्या जाणार आहेत. शालेय विद्यार्थिंनींसाठी दिल्या या जाणाऱ्या बसमध्ये सीसीटीव्ही, व्हीडीओ रेकॉर्डर, लोकेशन ट्रॅकर, अटेडेंट रेकॉर्डिंग, बायो मेट्रिक मशीन आणि लायब्ररी अशा सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त आहेत. या बस मुलींना घरापासून शाळेपर्यंत ने-आण करण्याचे काम करतील. महत्त्वाची बाब बसमध्ये चालक व वाहक महिलाच असतील.

शिवाय मुलींचे समुपदेशन करण्यासाठी समुपदेशकांसह एकूण ११ जणांची समितीही स्थापन केली जाईल. या समितीचे अध्यक्षपद कोपर्डी दुर्घटनेतील पीडितेच्या आईला देण्यात आले आहे. योजनेचा सर्व खर्च ट्रस्ट करणार असून यापुढील व्यवस्थापनाचे काम मात्र स्थानिक ग्रामवासियांकडे देण्यात आले आहे. शिवाय अधिकाधिक दानशूर व्यक्तींना या योजनेत हातभार लावून अधिकाधिक विद्यार्थिनींसाठी स्कूल बस सुरू करण्याचे आवाहन पौडवाल यांनी केले.............................पॉर्न साईट्समुळेच विकृतीत वाढ!पॉर्नसाईट्समुळे समाजात अश्लीलता वाढली असून सरकारने त्यावर तत्काळ बंदी घालण्याची गरज आहे. इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे वैचारिक क्षमता नसलेल्या व्यक्तीही इंटरनेटवर अनावश्यक गोष्टी पाहत आहेत. त्यामुळे विकृतीमध्ये वाढ होत असून गंभीर घटना घडत असल्याचे पौडवाल यांनी सांगितले. तरी सर्व जबाबदारी सरकारवर सोपवून पालकांनी निर्धास्त होऊ नये. मुलांवर संस्कार केल्यास नक्कीच त्यांची वृत्ती विकृतीमध्ये जाणार नाही, असेही त्या म्हणाल्या....................बलात्कार रोखण्यासाठी सूर्योदय संस्कार अभियानमुळात लोकांची मानसिकता बदलण्यासाठी संस्कार कमी पडत असल्याचे मत पौडवालयांनी व्यक्त केले. त्यामुळे देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील शाळेमध्ये ह्यसूर्योदय संस्कार अभियानह्ण राबविण्यात येणार आहे. सात दिवसीयया अभियानात त्या-त्या शाळेतील भाषांमध्ये प्रार्थना घेण्यात येतील. शिवाय भूमिवंदना, मातृवंदना असे संस्कार करणारे कार्यक्रम राबवणार असल्याचेही पौडवाल यांनी सांगितले.