गडचिरोली : जिमलगट्टा येथील ६६ केव्हीच्या विद्युत उपकेंद्रातून एकूण ६५ गावांना विद्युत पुरवठा होतो. मागील १५ दिवसांअगोदर या उपकेंद्रातील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाला होता. त्यामुळे ६५ गावे अंधारात होती. याच ठिकाणी ट्रान्सफार्मर लावून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु परिसरात विजेचा लपंडाव वारंवार सुरू आहे. १५ दिवसांपासून बेजुरपल्ली, मुळेवाई, मोतुकपल्ली, रेगुलवाई परिसरात वीज पुरवठा खंडीत आहे.वीज वितरण महामंडळाचे कर्मचारी दिवसभर काम करीत आहेत. परंतु त्यांना बिघाड मिळत नसल्याने हा परिसर अंधारात आहे. (वार्ताहर)
१५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित
By admin | Updated: September 30, 2016 02:17 IST