शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं ऐक्याआधी भाजपाशी युती तोडा!

By admin | Updated: May 3, 2017 04:08 IST

रिपब्लिकन ऐक्यासाठी बैठक घेणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आधी भारतीय जनता पार्टीसोबतची

मुंबई : रिपब्लिकन ऐक्यासाठी बैठक घेणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आधी भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या खरात गटाने केले आहे. भाजपा आणि रिपब्लिकन पक्षाच्या विचारांत फरक असून, रिपब्लिकन ऐक्याची घोषणा करणाऱ्यांनी आधी धर्मांध पक्षाची साथ सोडावी, असेही रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी सांगितले आहे.खरात म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाची आघाडी किंवा ऐक्य करण्याचे आवाहन आठवले यांनी केले आहे. समाजातील सर्व घटकांना एकसंघ करून रिपब्लिकन पक्ष तयार करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाची निर्मिती शोषितांना न्याय मिळवून देणे व धर्मांध, जातीयवादी, प्रांतवादी व मनुवादी पक्षांना विरोध करण्यासाठी झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देऊन काहीही करून सत्ता हस्तगत करणे, हे रिपब्लिकन पक्षाचे ध्येय नाही, असे म्हणत खरात यांनी आठवलेंना चिमटा काढला आहे.भाजपा हा जहाल हिंदुत्ववादी पक्ष आहे. रिपब्लिकन पक्षाच्या व भाजपाच्या विचारात फरक आहे. म्हणून रिपब्लिकन पक्षाची आघाडी, विलीनीकरण अथवा ऐक्य करावयाच्या आधी आठवले यांनी भाजपाशी सर्व प्रकारचे संबंध संपुष्टात आणावेत, असे आवाहन खरात यांनी मंगळवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ऐक्य विचारांचे व्हावे, सत्ता हे आपले अंतिम ध्येय नाही, असेही खरात यांनी सांगितले. बौद्धमय भारत निर्माण करणे हे आपले उद्दिष्ट असून, आंबेडकरवादी व मनुवादी एका नावेत बसू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)