ब्रासीलिया : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत यजमानपद मिळविणारा ब्राझील संघ आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आह़े
फुटबॉलबद्दल विशेष प्रेम असणा:या 12क् विश्लेषकांना घेऊन करण्यात आलेल्या या जागतिक सव्रेक्षणानुसार, ब्राझील या वेळी विजेतेपद मिळवू शकतो़ त्यांना फायनलमध्ये अर्जेटिना, स्पेन किंवा जर्मनी या संघांचा सामना करावा लागू शकतो, तसेच इंग्लंड संघ साखळी फेरीत स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो़
जगभरातील मार्केट प्रोफेशनल्स यांनी रायटरसोबत एक सव्रेक्षण केले आह़े यामध्ये ब्राझील संघाला पसंती देण्यात आली आह़े टोरंटोतील सीआयबीसीसोबत काम करणारे जॉन वेल्च म्हणाले, ‘‘ब्राझील या वेळी विश्वकप जिंकू शकतो़ त्यांना आपल्याच जमिनीवर पराभूत करणो इतर संघांना जमणार नाही़ ब्राझील संघ 3 किंवा 4 गोलने जिंकणार नसला, तरी कमी अंतराने का होईना, पण जिंकेल़’’ विशेष म्हणजे विश्लेषकांनी 2क्1क्मध्ये दक्षिण आफ्रिकामधील विश्वकपमध्ये स्पेनच्या विजयाची भविष्यवाणी केली होती़ मात्र, 2क्क्6मध्ये त्यांनी केलेली भविष्यवाणी चुकली होती़
विश्लेषकांनी गत विश्वकपमध्ये अत्याधुनिक आकडय़ांसोबत भविष्यवाणी केली होती़ मात्र, जर्मनीच्या ऑक्टोपस पॉलने 14 पैकी 12 सामन्यांतील विजेत्यांची बरोबर निवड केली होती़, तेव्हा विश्लेषकांवर पॉल बाबा भारी पडला होता़ गत वर्षी कन्फेडरेशन चषकात ब्राझीलने स्पेनवर 3-क् असा विजय मिळवत जेतेपद पटकावले होत़े याआधारे विश्लेषकांनी आगामी विश्वचषकात जेतेपदासाठी ब्राझीलला पसंती दिली आह़े (वृत्तसंस्था)
4याआधी ब्राझीलने 195क्मध्ये फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले होत़े त्यांना दोन लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत उरुग्वेकडून मात खावी लागली होती़ दरम्यान, विश्लेषकांनी जेतेपदाच्या दावेदारीत जर्मनीला दुसरे स्थान दिले आह़े अर्जेटिनाला तिसरे, तर स्पेनला चौथा क्रमांक दिला आह़े विश्लेषकांच्या मते, आगामी विश्वषक स्पर्धेत इंग्लंड संघ एकही गोल न करता मायदेशी परतणार आह़े ब्राझीलमध्ये 12 जूनपासून फुटबॉल विश्वचषकास प्रारंभ होणार आह़े