शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्राव्हो, टीम नागपूर !

By admin | Updated: January 29, 2015 01:03 IST

‘मेट्रो सिटी’ होण्याकडे वाटचाल करीत असलेल्या नागपूरच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली

नागपूरकर विद्यार्थ्यांची ‘व्हाईट हाऊस’कडून दखल : लेझिम पथकाचा फोटो संकेतस्थळावरनागपूर : ‘मेट्रो सिटी’ होण्याकडे वाटचाल करीत असलेल्या नागपूरच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या गणतंत्रदिनाच्या परेडमध्ये नागपुरातील १६० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लेझिमचे सादरीकरण केले होते. लेझिम पथकाने ओबामा यांना इतके प्रभावित केले की ‘व्हाईट हाऊस’च्या संकेतस्थळावर त्यांच्या निर्देशांनुसार या परेडचा हा फोटो ‘अपलोड’ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २६ जानेवारी रोजीचा ‘फोटो आॅफ द डे’ असा याचा उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीमुळे नवी दिल्लीतील राजपथ येथे पार पडलेल्या यंदाच्या गणतंत्रदिवसाच्या परेडमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. प्रजासत्ताक दिनी राजपथावर प्रस्तुत करण्यात आलेल्या निरनिराळ्या चित्ररथांसोबत पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. यातील लेझिम पथकात नागपुरातून २० शाळांच्या १६० विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या उपक्रमातून नागपूर लेझिम टीम दिल्लीत पोहचली होती. या लेझिम पथकाची दखल केवळ दिल्लीकरांनीच नव्हे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील घेतली. त्यांना या लेझिम पथकाच्या सादरीकरणाने प्रभावित केले. ‘व्हाईट हाउस’च्या अधिकृत संकेतस्थळावर या लेझिम पथकाचे फोटो प्रसिध्द करण्यात आले आहे. यासोबतच चित्ररथांमध्येदेखील महाराष्ट्राच्याच चित्ररथाचा फोटो दिसून येत आहे. (प्रतिनिधी)