शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

विमानांच्या अत्यंत जलद सेवेला बसतो आहे ‘ब्रेक’

By admin | Updated: May 20, 2014 03:44 IST

बस, रेल्वेपेक्षा अत्यंत जलद देणारी सेवा म्हणजेच विमानसेवा मानली जाते. मात्र या जलद सेवेला सध्या ‘ब्रेक’ लागत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : बस, रेल्वेपेक्षा अत्यंत जलद देणारी सेवा म्हणजेच विमानसेवा मानली जाते. मात्र या जलद सेवेला सध्या ‘ब्रेक’ लागत असल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांत मुंबई विमानतळावरील ८२३ विमान उड्डाणे उशिराने धावल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून सांगण्यात आले आहे. मात्र फेब्रुवारी ते एप्रिल अशा प्रत्येक महिन्याची तुलना केली असता उड्डाणे उशिराने धावण्याचे प्रमाण हे कमीच असल्याचे मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी दोन विमानतळे असून, यात टी-२ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात आले आहे. या नवीन विमानतळामुळे विमानांचा प्रवास सुकर झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही तांत्रिक आणि इतर विविध कारणांमुळे मुंबई विमानतळावरील विमानांची उड्डाणे लांबणीवर पडत असून, ती उशिरानेच धावत आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात ३५३, त्यानंतर मार्च महिन्यात २५२ आणि एप्रिल महिन्यात २१८ उड्डाणे उशिराने धावली आहेत. एप्रिलमध्ये उशिराने धावलेल्या उड्डाणांमध्ये तर ६३ उड्डाणे जेट एअरवेजची, ५८ उड्डाणे एअर इंडियाची असून, ९७ उड्डाणे इतर विमान कंपन्यांची आहेत. हे प्रमाण पाहता ते कमीच होत असल्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील एका अधिकार्‍याने सांगितले. उड्डाणे उशिराने धावण्याचे प्रमाण जवळपास १३ टक्के कमी झाले आहे. याविषयी अधिकार्‍याने सांगितले की, जास्तीतजास्त तांत्रिक चुकांमुळेच उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाण आहे. मात्र टी-२मुळे विमानांचा मार्ग सुकर झाला हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)