शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलाने केली आत्महत्या,प्रेयसीच्या घरात लावला गळफास

By admin | Updated: February 17, 2017 01:16 IST

पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या,गुरुवारी रात्री उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 - लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमी युगुलाने गळफास लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्री उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. दिपीका दिलीप सिंग (वय १८) आणि सोनू हबिब शेख (वय २१) असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
दिपीका तिच्या आईसह लकडगंजमधील भाऊराव नगरात नामदेव वानखेडे यांच्या घरी भाड्याने राहायची. तिचे दोन भाऊ पुण्याला नोकरी करतात. तर, सोनू आधी सतरंजीपु-यात राहत होता. सध्या त्याचे कुटुंब पारडीतील सुभाननगरात राहते. सोनूच्या भावाचा वाहतूक व्यवसाय आहे. 
दिपीका आणि सोनूचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ते नेहमीच सोबत फिरायला जायचे. ते दोघांच्या कुटुंबीयांनाही माहित होते. दिपीका तिच्या आईला अजिबात ऐकत नव्हती. रोज रोज होणारे वाद टाळण्यासाठी आईने तिला बोलणे सोडले होते. काही दिवसांपासून सोनू  रात्री बेरात्री घरी यायचा आणि दीपीकाला सोबत न्यायचा.खाणेपिणे करून ते नंतर पहाटे परतायचे. बुधवारी तसेच झाले. रात्री सोनू तिला आपल्या दुचाकीवर घेऊन गेला आणि हे दोघे पहाटे परतले. त्यानंतर दोघेही सोनूच्या रूममध्ये गेले. पहाटे परतल्यानंतर ते दिवसभर झोपतात, हे माहित असल्यामुळे आईनेही लक्ष दिले नाही. गुरुवारी रात्रीचे ८ ते ८.३० वाजूनही दिपीका तिच्या रूममधून बाहेर आली नसल्याने तिच्या आईने आवाज दिले. रुममध्ये टीव्ही सुरू होता. आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून आईने घरमालकाला सांगितले. त्यानंतर घरमालक वानखेडे यांनी बाजुच्या खिडकीचे तावदान सरकवून बघितले असता दोघेही ओढणीने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शेजा-यांनी लकडगंज ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार सत्यवान माने आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. या दोघांचे मृतदेह खाली उतरवण्यात आले. ते रुग्णालयात पाठविल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली.  
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात 
 
पोलिसांनी खोलीची तपासणी केली असता या दोघांचे पती-पत्नीसारखे अनेक फोटो आढळले. मात्र, सुसाईड नोट किंवा अन्य दुसरे कागदपत्र आढळले नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली ते स्पष्ट झाले नव्हते. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पोलीस घटनास्थळी तपास करीत होते.