शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रांगले कुटुंबावरील बहिष्कार अखेर माग

By admin | Updated: January 23, 2015 00:49 IST

पोलीस, अंनिसची मोहीम : ‘लोकमत’च्या सडेतोड वृत्ताची दखल आणि कौतुक, ग्रामस्थांची सकारात्मक भूमिको

शिवाजी गोरे - दापोली -दापोली तालुक्यातील लोणवडी गावातील मोहन रांगले यांना जातपंचायतीने १५ वर्षांपूर्वी वाळीत टाकले होते. ‘लोकमत’ने वाळीत प्रकरण हाताळल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. दापोली पोलीस स्थानकात झालेल्या बैठकीत या कुटुंबाला गावात घेण्याचा एकमुखी निर्णय झाला.या बैठकीला पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पीडित कुटुंब मुंबई मंडळ, स्थानिक ग्रामस्थ मंडळ, अंनिसच्या मुक्ता दाभोलकर, पोलीस उपविभागीय अधिकारी विलास भोसले, महिला दक्षता समितीच्या संपदा पारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, उपपोलीस निरीक्षक संभाजी यादव, हवालदार सत्यवान मयेकर उपस्थित होते.  मोहन रांगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरुवारी दापोली पोलिसांनी वाळीत प्रकरणाची गंभीर दखल घेत बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबई मंडळ व स्थानिक ग्रामस्थ मंडळ या दोन्ही मंडळानी सुरुवातीला एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप केले. मोहन रांगले यांचे कुटुंब वाळीत नाही, असेसुद्धा सांगण्यात आले. परंतु मुंबई मंडळाने मोहन रांगले यांची बाजू मांडत गावातील वाद मिटायलाच हवेत, असे सांगितले. मुंबई मंडळाने रांगले यांची बाजू उचलून धरल्याने स्थानिक ग्रामस्थ मंडळसुद्धा मुंबई मंडळ आम्हाला विश्वासात घेऊन निर्णय देत नसल्याचा आरोप केला. आरोप - प्रत्यारोपानंतर ३ तास बैठक सुरु राहिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, संभाजी यादव यांनी कायद्याचे मार्गदर्शन केले. वाद वाढवण्यापेक्षा हा विषय मिटायला हवा, नाहीतर कायद्याने सर्वांना शिक्षा होऊ शकते, असे सांगितले. न्यायालयाने केलेल्या वाळीत कायद्याचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मात्र ग्रामस्थ नरमले व सर्वांनी गावाच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मोहन रांगले यांच्याशी असलेला हा वाद मिटायला हवा, असाही विषय बैठकीत झाला. सुरुवातीला सरपंचांनी ही बैठक २७ तारखेला बोलवा, अशी भूमिका घेतली. मात्र, पोलिसांनी या विषयावर आजच तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मंडळानी याला सहमती दर्शवली. १५ वर्षांपूर्वीचा जातपंचायतीचा वाळीत विषय मिटला, असे जाहीर करण्यात आले.पोलीस स्थानकाच्या आवारातील महापुरुष देवळात झालेल्या बैठकीला लोणवडी येथील ग्रामस्थ उपस्थित होेते. गावाच्या हितासाठी दोन मंडळे काम करत आहेत. यापूर्वी कुटुंबाला वाळीत टाकून दंड आकारला जात होता. यापुढे ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.अंनिस अन्यायग्रस्तांच्या पाठीशीअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी वाळीत प्रकरण हा सामाजिक गुन्हा आहे. वाळीत टाकणाऱ्याला कायद्याने कठोर शिक्षा होऊ शकते. या कायद्याचे पालन करावे, समाजहितासाठी कोर्टाने हा कायदा केला आहे. त्यामुळे कोणी एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकत असेल, तर अंनिस त्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम राहील, असे सांगितले.मोहन रांगले कुटुंब गेली १५ वर्षे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. जातपंचायतीच्या सामाजिक बहिष्काराचे चटके किती गंभीर असतात. वाळीत टाकलेल्या कुटुंबाला कशी वागणूक दिली जाते, हे प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणले. अखेर लोकमतच्या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली. या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप व संभाजी यादव यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताचे कौतुक केले. ‘लोकमत’चे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकल्याने त्यांना धन्यवाद दिले.हे प्रकरण कायमस्वरूपी मिटवण्यासाठी पोलिसांनी सायंकाळी ६ वाजता ग्रामस्थांची गावातच बैठक घेतली. रांगले कुटुंबाला पेढा भरवून या प्रकरणाची इतिश्री झाली. बहिष्कार मागे घेतल्याची हाळीही गावात देण्यात आली.लोकमतचाप्रभाव