शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटी दहीहंडीवर बहिष्कार टाका

By admin | Updated: July 8, 2017 04:23 IST

दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, अशीच सर्वांची भूमिका आहे. मात्र, दहीहंडीच्या नावाखाली डीजे लावणे, चित्रपट कलाकारांचे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, अशीच सर्वांची भूमिका आहे. मात्र, दहीहंडीच्या नावाखाली डीजे लावणे, चित्रपट कलाकारांचे डान्स, तमाशा आणि सेलिब्रिटींचेच प्रस्थ वाढले आहे. दहीहंडीचे बाजारीकरण थांबविण्यासाठी अशा आयोजकांवर गोविंदा पथकांनीच बहिष्कार टाकावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडी समन्वय समितीला केले आहे. न्यायालयाने दहीहंडीची उंची व गोविंदांच्या वयाबाबत निर्बंध घातले होते. त्याला ‘जय जवान’ पथकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर १० जुलै रोजी सुनावणी आहे. या याचिकेच्या अनुषंगाने दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर, समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज ‘कृष्णकुंज’ येथे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. आयोजनावर आलेले निर्बंध व न्कायदेशीर लढाईची माहिती समितीने राज ठाकरे यांना दिली. यावर, उत्सवांचे बाजारीकरण थांबवा, मग आयोजनांवर कुणीच हरकत घेणार नाही, असा सल्ला राज यांनी दिला. उत्सवात डीजे, लाउडस्पीकर, सेलिब्रिटीज नकोत. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात ती साजरी व्हावी. धांगडधिंग्याला प्राधान्य देणाऱ्यांच्या हंड्या फोडू नका, असे आवाहन समितीने गोविंदा पथकांना करावे, अशी सूचना राज यांनी केली. राज यांची भूमिका समितीला पटली आहे. लवकरच अन्य घटकांशी चर्चा करून, अधिकृत भूमिका मांडण्यात येईल, असे समन्वय समितीचे सरचिटणीस कमलेश भाईर यांनी सांगितले.