शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वा-यावर सोडलेल्या मुलाला पोटगी

By admin | Updated: November 6, 2014 03:24 IST

हुंड्यासाठी झालेल्या छळातून पत्नीचा भाजून मृत्यू झाल्यानंतर, तिच्यापासून झालेल्या मुलाला वाऱ्यावर सोडून गेलेल्या पित्याने त्या मुलाला दरमहा १० हजार रुपये पोटगी द्यावी,

मुंबई : हुंड्यासाठी झालेल्या छळातून पत्नीचा भाजून मृत्यू झाल्यानंतर, तिच्यापासून झालेल्या मुलाला वाऱ्यावर सोडून गेलेल्या पित्याने त्या मुलाला दरमहा १० हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.आईचा मृत्यू झाला तेव्हा हा मुलगा जेमतेम तीन वर्षांचा होता. त्याला आपल्यासोबत न देता त्याचे वडील राजस्थानला गावाकडे निघून गेले. तेव्हापासून गेली १२ वर्षे त्याचा सांभाळ व पालनपोषण मुंबईतील त्याचा मामा करीत आहे. (या प्रकरणातील मुलगा अल्पवयीन आहे. त्यास भावी आयुष्यात त्रास होऊ नये यासाठी बातमीत त्याचे, त्याच्या वडिलांचे अथवा मामाचे नाव दिलेले नाही)खरे तर मुलाची जबाबदारी वडिलांनी घ्यायला हवी. परंतु ते त्याच्याकडे ढुंकूनही पाहात नाहीत. इतकी वर्षे भाच्याला आपण सांभाळले व शाळेतही घातले. पण स्वत:चे कुटुंब सांभाळण्याखेरीज भाच्याची जबाबदारी पेलणे कठीण जात आहे. त्यामुळे त्याच्या वडिंलाना दरमहा खर्ची द्यायला सांगावी, असा अर्ज या मुलाच्या वतीने मामाने केला होता. त्यावर वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने वडिलांनी मुलासाठी दरमहा दोन हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश कुटुंब न्यायालयाने आॅक्टोबर २००८ मध्ये दिला होता.याविरुद्ध भाच्याच्या वतीने मामाने केलेले अपील मंजूर करून न्या. अभय ओक व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पोटगीची रक्कम दोनवरून १० हजार रुपये अशी वाढविण्याचा आदेश दिला. पोटगीची २००८ पासूनची वाढीव रक्कम एक महिन्यात द्यावी व नोव्हेंबरपासूनची पोटगीची रक्कम दरमहा सात तारखेपर्यंत मुलाच्या बँक खात्यात थेट जमा करावी,असा आदेशही दिला गेला.या मुलाचे वडील मुळचे राजस्थानमधील नाथव्दार येथील आहेत. तेथे त्यांची साड्या व कपड्यांची दोन दुकाने आहेत. शिवाय ते कमिशन एजन्टचाही धंदा करतात. त्यांची साम्पत्तीक स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने १० हजार रुपये ही पोटगीची रक्कम ठरविली. नाथव्दार येथील दुकाने आपली नाहीत, तर आपल्या वडिलांची आहेत व तेथे आपण नोकर म्हणून काम करतो व त्याबद्दल आपल्याला दरमहा जेमतेम दोन हजार रुपये पगार मिळतो, हा मुलाच्या वडिलांनी केलेला दावा खंडपीठाने अमान्य केला.मुलाच्या वडिलांनी विविध न्प्रकरणात उत्पन्न व सांम्पत्तीक स्थिती याविषयी निरनिराळी आकडेवारी दिली आहे. किंबहुना मुलाला पोटगी द्यावी लागू नये यासाठी पित्याने कुटुंब न्यायालयात खोटी माहिती दिली होती. (विशेष प्रतिनिधी)