शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

खांडचा बंधारा एव्हरग्रीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 02:22 IST

पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे शांत व निसर्गसौदर्य लाभलेल्या विक्रमगडमधील मोस्ट पॉप्युलर पिकनिक पाईट म्हणजेच पलुचा धबधबा.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे शांत व निसर्गसौदर्य लाभलेल्या विक्रमगडमधील मोस्ट पॉप्युलर पिकनिक पाईट म्हणजेच पलुचा धबधबा. नंतर विक्रमगडकरांची शान असलेला व बारमाही पाणी असलेला खांडचा बंधारा असून निसर्गाने भरभरुन दिलेल्या या भागात पावसाळयात मनसोक्त आनंद लुटणाऱ्यांचाही गर्दी असते.विक्रमगड तालुक्यातील निसर्गाने मुक्त उधळण करून येथील पर्यटकांना सर्व काही भरभरुन दिले आहे. त्यामुळै शनिवार व रविवार पलूचा धबधबा व खांडचा बंधारा येथे पर्यटकही येत असतात. व पाण्यामध्ये डुुंबण्याचा मनसोक्त आनंद लुटत असतात.पावसाळा सुरु झाला की,या नैसर्गीक सौदर्यात भर घालतात ते येथील पांढरेशुभ्र धबधबे. विक्रमगडपासून डोंगरावर जंगल आहे. हाच जंगलपटटा निसर्गमित्र यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. विविध प्रजातीचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्यानें पक्षी निरिक्षकही या भागात येथे येत असतात. खांडचा बंधारा हा विक्रमगडपासून हाकेच्या अंतरावर वसलेला आहे. जून ते आॅक्टोंबर या काळात येथे पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद लुटण्याकरीता पर्यटकही येतात. दगड व चिखलवाट तुुडवतच येथे जावे लागते. या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते.मुंबई परिसर व अन्य ठिकाणाहून पर्यटक येथील निसर्गाचे अद्भूत रुप पाहावयास येतात. पक्ष्यांचा किलबिलाट,पाण्याचा खळखळाट असे निसर्गसंगीतच येथे पाहावयास मिळते. विविध प्रकारे कीटक, फुलपाखरु, वनस्पती, वनौषधी येथील महत्वाचे घटक आहेत. या भागाच्या डोंगरमाथ्यावरुन पाहाल तर जिथे तिथे हिरवाईचे साम्राज्य आणि त्यातून डोकावणारे छोटे छोटे धबधबे दिसतात. त्यामुळे विक्रमगडचा खांडचा बंधारा खास आकर्षण बनतोय.विक्रमगड पासून अवघ्या १ कि.मी अंतरावर खांड गावानजिक हे पे्रक्षणीय स्थळ आहे. हा बंधारा पावसाळयात कायम पर्यटकांनी भरलेला असतो. विक्रमगडमधील शाळा, कॉलजचे विदयार्थी सहलीसाठी येथे वर्षातून भेट देत असतात.>डुंबण्याची लुटता येते येथे भरपूर मौजविक्रमगड ग्रामपंचायत अंतर्गत याच बंधाऱ्यातून विक्रमगड शहर, यशवंतनगर, वाकडुचापाडा, टोपलेपाडा, संगमनगर आदी भागांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. आतापर्यत या बंधाऱ्यामुळे पाण्याची मुबलक सोय झालेली आहे. या बांधारावर पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी वर्षभर गर्दी असते. छोटासा चौकोनी आकाराचा हौदासारखा भाग असून तो जास्त खोलगट नाही व त्यामध्ये पाणी भरुन राहात असल्याने त्यात डुंबण्याची मजा काही औरच आहे.