शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

बाऊन्सर हत्याप्रकरणातील सूत्रधार ‘जॉन’च

By admin | Updated: April 8, 2017 03:21 IST

बाऊन्सर विक्की शर्माच्या हत्याप्रकरणामागचा मुख्य सूत्रधार मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेला जॉन अ‍ॅग्नोलो असल्याचे तपासात समोर आले

मुंबई : डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक अमित पाटील समजून गोळीबारात मरण पावलेल्या बाऊन्सर विक्की शर्माच्या हत्याप्रकरणामागचा मुख्य सूत्रधार मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेला जॉन अ‍ॅग्नोलो असल्याचे तपासात समोर आले आहे. गँगस्टर विजय शेट्टीच्या सांगण्यावरून त्याने अमित पाटीलची सुपारी घेतली होती. कल्याण-शीळ रोडवरील काटईनाका येथे गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी शिवसेनेचा पदाधिकारी आणि व्यावसायिक अमित पाटील समजून विकी शर्मा या त्याच्या बाऊन्सरवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात बिल्डरचा बाऊन्सर ठार झाला होता. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हत्याकांडाच्या १३व्या दिवशी पोलिसांनी कुख्यात गँगस्टर अबू सालेमचा हस्तक राकेश उर्फ राजू हातणकर याच्या अटकेनंतर अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा शकीलचा सुपारीकिंग हस्तक मोहंमद टक्काच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर शार्प शूटर बच्चा यादवलाही बेड्या ठोकल्या. शूटर्सच्या गोळीबारात पाटीलऐवजी शर्माची हत्या झाल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. त्यातून या हत्येमागचे मूळ गूढ उकलणार असल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>जॉनची पार्श्वभूमीमूळचा खार येथील रहिवासी असलेल्या जॉनने १९८६मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या साथीदारासह एका इसमाची अ‍ॅसिड टाकून हत्या केली. त्याचा मोठा भाऊ काल्या अ‍ॅन्थोनी आणि ठाकूर एकत्र काम करत होते. त्याच्याविरुद्ध मुंबईसह दिल्ली पोलिसांनी टाडा अंतर्गत कारवाई केली होती. व्यापाऱ्याकडून खंडणी उकळणे, तसेच नालासोपारा येथे २००३मध्ये झालेल्या हत्येप्रकरणातही तो आरोपी आहे. तसेच खेरवाडी, निर्मलनगर पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.