शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा शस्त्र प्रकरणी महिलेसह दोघांना अटक

By admin | Updated: October 6, 2016 17:26 IST

फरासखाना पोलिसांनी खब-यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका महिलेसह दोघाजणांना अटक केली असून या दोघांकडून एकूण पाच

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 06 - फरासखाना पोलिसांनी खब-यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका महिलेसह दोघाजणांना अटक केली असून या दोघांकडून एकूण पाच पिस्तूलांसह ११ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहात असलेल्या पतीला सोडवण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी बेकायदा शस्त्र विक्रीचा प्रयत्न आरोपी महिलेने केला, असल्याची माहिती परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. पद्मा शिवाजी जाधव (वय ३०, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रस्ता), इफ्तिकार मुश्ताक अत्तार (वय २५, रा. अवसरी बुद्रुक, मंचर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना शस्त्र पुरवणारा फारुख (रा. मध्यप्रदेश) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलिसांच्या तपास पथकाचे पोलीस कर्मचारी सागर केकाण यांना खब-याने आरोपी महिला शस्त्र विक्रीसाठी मंगळवार पेठेत येणार असल्याची माहिती दिली होती. वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र चव्हाण यांच्या सुचनांनुसार, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, सागर केकाण, अमेय रसाळ, संजय गायकवाड, बापू खुटवड, ज्ञानेश्वर देवकर, ईकबाल शेख, विनायक शिंदे, संदीप पाटील, बाबासाहेब गिरे, शंकर कुंभार, अमोल सरडे, हर्षल शिंदे यांच्या पथकाने सापळा लावला. मंगळवार पेठेतील श्रीकृष्ण चौकामध्ये दुचाकीवरुन आलेल्या पद्मा आणि अत्तारला ताब्यात घेण्यात आले. पद्माच्या दुचाकीची झडती घेतली असता डिकीमध्ये देशी बनावटीचे तीन पिस्तूले आणि 8 जिवंत काडतुसे मिळून आली. तर अत्तारच्या अंगझडतीमध्ये दोन पिस्तुले आणि ३ जिवंत काडतुसे आढळून आली. ही सर्व शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पद्माचा पती गणेश बबन खैरमोडे (रा. शनि मंदिरामागे, बिबवेवाडी) याच्यावर दत्तवाडी आणि सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये तो एक वर्षापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याला सोडवण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करायची असल्याने पिस्तुलाची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे पद्माने तपासादरम्यान सांगितले आहे. अत्तारच्या ओळखीच्या फारुख याच्याकडून ही शस्त्रे आणण्यात आली होती. ही कारवाई उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखेने शस्त्र तस्करीप्रकरणी जेनीबाई नावाच्या महिलेला अटक केली होती. आता पद्माला अटक झाल्यामुळे महिलांचा बेकायदा शस्त्र तस्करीतील सहभाग वाढत असल्याचे दिसत आहे.