शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही वाहन परवाने प्रक्रिया आॅनलाईन

By admin | Updated: December 16, 2015 00:07 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालय : घरबसल्या पैसेही भरता येणार; थेट परीक्षेचीच वेळ मिळणार

कोल्हापूर : वाहन चारचाकी असो अथवा दुचाकी; वाहन चालविण्याचा परवाना अर्थात ‘शिकाऊ अनुज्ञप्ती’ व ‘पक्की अनुज्ञप्ती’साठी ‘सारथी ४.०’ या नव्या संगणक प्रणालीचा वापर राज्यात प्रथमच ‘पथदर्शी प्रकल्प’ म्हणून प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात २३ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीत यापूर्वी केवळ शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसेन्स) करिता आॅनलाईन अपॉइंटमेंट ६६६.रं१३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावरून घ्यावी लागत होती. मात्र, आता यात बदल केला असून ६६६.स्रं१्र५ंँंल्ल.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरून सर्व शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती अर्थात वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी आॅनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. यात परवान्यासाठी लागणारे शुल्कही आॅनलाईन बँकिंगद्वारे स्टेट बँक आॅफ इंडियासह अन्य राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अर्जदाराला भरता येणार आहे. याकरिता केवळ कार्यालयात येऊन तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. यात केवळ शुल्काव्यतिरिक्त पाच रुपये जादा भरावे लागणार आहेत. अर्जदाराने अर्ज भरताना लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आपले छायाचित्र व सही अपलोड करावी लागणार आहे. याशिवाय आधार कार्ड किंवा वयाचा दाखलाही अपलोड करावा लागणार आहे. सध्या पक्के व शिकाऊ असे प्रत्येकी १४० परवाने दररोज लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन या कार्यालयाकडून दिले जातात. यापूर्वी केवळ लर्निंग लायसेन्ससाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज करून परीक्षेची वेळ मिळविता येत होती. आता मात्र, प्रायोगिक तत्त्वावर राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूर उपप्रादेशिक कार्यालयात दोन्ही परवाने नागरिकांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर मिळणार आहेत. पैसेही रांगेत उभे राहून न भरता नेट बँकिंगद्वारे प्रथम स्टेट बँकेत भरावे लागणार आहेत.- लक्ष्मण दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी