शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी काढण्याच्या नादात बँडस्टँडच्या सुमद्रात दोघे बुडाले

By admin | Updated: January 9, 2016 13:07 IST

सेल्फी काढण्याच्या नादात वांद्र्यातील बँडस्टँड येथील समुद्रात दोन जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.

ऑनलाइन लोकमत
वांद्रे, दि. ९ - वेगवेगळ्या अँगल्समधून, मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फी काढून ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकण्याचे वेड सध्याच्या तरूणाईला लागले असून त्यापायी ते अनेकदा आपला जीवही धोक्यात घालतात. अशीच एक घटना वांद्र्यातील बँडस्टँड येथे घडली असून सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात दोन जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.
शनिवारी सकाळी तरूण-तरूणींचा एक ग्रुप बँडस्टँड येथे आला होता, ओहोटी असल्याने ते सगळे समुद्रात पुढपर्यंत जाऊन एका खडकावर उभे राहून फोटो काढत होते. मात्र सेल्फी काढण्यात ते एवढे मश्गूल होते की ओहोटी संपून भरती सुरू झाल्याचेही त्यांच्या लक्षातच आले नाही. थोड्याच वेळात समुद्राचे पाणी वाढू लागले आणि तीन तरूणी पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या मित्राने समुद्रात उडी मारली.
तेथे उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांनी या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिस व जीवरक्षक दलाच्या जवानांनी तातडीने शोधमोहिम सुरू केली. समुद्रात बुडालेल्या दोन तरूणींना वाचवण्यात यश मिळाले असले तरी एका तरूणीचा मृत्यू झाला असून तो तरूण अद्याप बेपत्ता आहे.