शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गतिमंद महिलेच्या हत्येप्रकरणी दोघे अटकेत

By admin | Updated: April 26, 2016 02:37 IST

गतिमंद महिलेच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली. सुरेश तनवार (२०) आणि महेंद्र धनीय (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

मुंबई : मालवणी येथे गेल्या शुक्रवारी झालेल्या एका गतिमंद महिलेच्या हत्येप्रकरणी मालवणी पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली. सुरेश तनवार (२०) आणि महेंद्र धनीय (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.मालवणीच्या जुलियसवाडी झोपडीपट्टी परिसरात गीता पाटणकर (७५) या त्यांची विधवा आणि गतिमंद मुलगी ऊर्मिला राजेश कदम (३२) तसेच त्यांचा नातू राजू (८) यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. तर आरोपी तनवार आणि धनीय हे मालवणी चर्च परिसरात मेणबत्त्या विकण्याचे काम करतात. पाटणकर आणि कदम या याच ठिकाणी साफसफाई करण्याचे काम करीत होत्या. काही दिवसांपूर्वी या दोघींची भेट तनवार आणि धनीय यांच्याशी झाली. त्यावेळी ४५ हजारांत चांगल्या ठिकाणी झोपडी घेऊन देण्याचे आमिष त्यांनी या दोघींना दाखविले. त्यांच्या आमिषाला बळी पडून या दोघींनी त्यांनी जमा केलेली रक्कम या दोघांना दिली. मात्र त्यानंतर या दोघांनी त्यांना टाळण्यास सुरुवात केली. तसेच झोपडीही घेऊन दिली नाही. त्यामुळे अखेर कंटाळून कदम यांनी पैसे परत मागितले. शिवाय पोलिसांत तक्रार करू, असेही सांगितले. यावर आरोपींनी कदम यांचा काटा काढण्याचे ठरवले.२२ एप्रिल रोजी रात्री एकच्या सुमारास हे दोघे कदमच्या घरी गेले आणि त्यांनी गळा दाबून तिची हत्या केली. तसेच पाटणकर यांनाही धमकावले. मात्र मुलीचे अंत्यसंस्कार उरकल्यानंतर पाटणकर यांनी सोमवारी सकाळी याप्रकरणी मालवणी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींना २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)