शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वसईमधील दोघींची उत्तर प्रदेशातून मुक्तता

By admin | Updated: June 28, 2016 03:06 IST

दोन अल्पवयीन तरुणींची उत्तरप्रदेशातील वेगवेगळया ठिकाणांहून सुटका करण्यात आल्याने वसईत खळबळ उडाली.

शशी करपे,

वसई- आठ महिन्यांपूर्वी वसईच्या कोळीवाडा परिसरातूनगाब झालेल्या फरजाना शेख यांच्या मुलीला गोरखपूर येथे पळवून नेल्याचे उजेडात आले असतानाच याच परिसरातून, नेमक्या त्याच काळात गायब झालेल्या आणखी दोन अल्पवयीन तरुणींची उत्तरप्रदेशातील वेगवेगळया ठिकाणांहून सुटका करण्यात आल्याने वसईत खळबळ उडाली. एका प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असली तरी दोन अल्पवयीन मुलींच्या गायब होण्या मागील रहस्य उलगडण्याचे काम पोलीस करीत आहेत. यामागे अनैतिक मानवी व्यापार करणारी एखादी टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस या प्रकरणात अतिशय गोपनीय तपास करीत असल्याने अधिक माहिती मिळणे कठीण झाले आहे. वसई कोळीवाड्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरात पळवून नेणाऱ्या तरुणाला तब्बल आठ महिन्यांनी वसई पोलिसांनी अटक केली आहे. सोबत पोलिसांच्या तपास पथकाला याखेरीज उत्तरप्रदेशच्या विविध भागातून एकूण तीन मुलींचा शोध लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तपास पथकाने तीन मुलीची सुटका केली असून त्यातील २१ नोव्हेंबर २०१५ च्या प्रकरणातील आरोपी सद्दाम अन्सारी विरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केलीआहे.वसई गावातील झेंडाबाजार येथे राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील फरजाना शेख यांनी आपल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला वसई कोळीवाड्यात काही दिवसांपूर्वी रहावयास आलेल्या आरोपी सद्दाम अन्सारी (२२) याने १९ आॅक्टोबर २०१५ रोजी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वसई पोलीस ठाण्यात केली होती. फरजाना हिने याप्रकरणी केलेल्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने हे प्रकरण गंभीर बनले होते. >फरजानांच्या प्रयत्नामुळे तिघींची सुटकावसई पोलिस ठाण्यात २०१५-२०१६ मध्ये फराजांना शेख यांच्या मुलीची मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर पाठोपाठ दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र या तिघींचा शोध काही लागत नव्हता,अखेर फरजाना शेख च्या अथक प्रयत्नाने केवळ त्यांच्याच नाही तर इतर दोन मुलीही आठ महिन्यांनी पोलिसांच्या हाती लागल्या.एकंदर हा प्रकार अनैतिक मानवी वाहतुकीचा असून या सर्व मुली उत्तर प्रदेशाच्या गोरखपूर जिल्ह्यातील विविध गावामधून सापडल्यामुळे वसईच्या झेंडाबाजार,कोळीवाडा ते उत्तरप्रदेश ,गोरखपूर असा नेमका संबंध काय? याचा तपास वरिष्ठाकडून होणे गरजेचे आहे.>पोलिसांनी केले होते दुर्लक्षपोलिसांनी प्रेम प्रकरणातून मुलगी पळाली असल्याचे कारणपुढे करीत या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष केल ेहोते. मात्र, मुलीची आई फरजाना शेख यांनी आपल्या अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी वसई पोलिसांशी संघर्ष सुरुकेला, प्रसंगी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर धरणेही धरले होते.फरजाना शेख यांनी गृहराज्यमंत्री आणि शेवटी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे दबाव आल्यानंतर पोलिसांनी सद्दामला शोधण्यासाठी उत्तरप्रदेशात पथके रवाना केली होती. शेवटी त्याला अल्पवयीन मुलीसह गोरखपूर येथून ताब्यात घेण्यात आले होते.