शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

‘ती’च्या नोकरीची महती दोन्ही पिढ्यांना कळली!

By admin | Updated: December 16, 2014 00:02 IST

विवाहित तरुणी परीक्षागृहात : आजीबाई मात्र दंग बाहेर नातवंडे सांभाळण्यात...

सातारा : पूर्वी लेकी-सुनांनी शिक्षणासाठी बाहेर पडायचे म्हटले तरी दिव्य मानले जायचे. लग्नानंतर तर शिकून या काय करणार? असा सूर सासरची मंडळी हमखास आळवायची! आता मात्र लेकी-सुनांच्या नोकरीची महती जुन्या अन् नव्या पिढीला कळू लागली आहे. लेकी-सुना परीक्षेसाठी वर्गात गेल्यानंतर या आजीबाई बाहेर नातवंडे सांभाळण्यात दंग असल्याचे सुखद चित्र रविवारी साताऱ्यात पाहायला मिळाले.रविवारी शहरातील सुमारे १६ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) झाली. सुमारे नऊ हजार परीक्षार्थींनी दोन टप्प्यांत ही परीक्षा दिली. महिला उमेदवार परीक्षा देण्यासाठी गेल्यावर कुटुंबातील सदस्यांना लहान मुलांना सांभाळावे लागले.‘चूल आणि मूल’ ही चौकट तोडणे महिलांसाठी किती अवघड होते, याची झलक अडीच दशकांपूर्वी स्मिता पाटील यांच्या ‘उंबरठा’ या चित्रपटातून पाहायला मिळाली होती. अलीकडेही एकाच्या पगारात संसाराचा गाडा हाकणे अशक्य असल्याचे जवळपास सर्वच मध्यमवर्गीय लोकांच्या लक्षात आले आहे. म्हणूनच शिक्षणाचा योग्य उपयोग करून संसाराला हातभार लावण्यासाठी सुनांना घराबाहेर जाण्याची मुभा दिल्याचे जवळपास सर्वच कुटुंबांमध्ये पाहायला मिळत आहे. असं म्हणतात की, ज्येष्ठ मंडळी आपल्या मतांमध्ये वयोमानानुसार बदल करत नाहीत; पण विचारांच्या क्रांतीत अग्रेसर असलेल्या साताऱ्यातील ज्येष्ठांनी हा समज खोटा ठरविला आहे. आयुष्यभर चूल आणि मूल करणाऱ्या अनेक सासू आता सुनेने परीक्षा देऊन नोकरी करावी, ही इच्छा बाळगतात आणि त्यासाठी कृतिशील सहभाग नोंदवत आपल्या सुनेच्या नोकरीचा खंबीर पायाही रचूनदेतात. (प्रतिनिधी)बदलाचे द्योतककोणत्याही प्रसंगी महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून तीला आधार दिल्याचे चित्र या निमित्ताने दिसून येत आहे. हे चित्र आता एक प्रकारे बदलाचे द्योतकच म्हणावे लागेल. आमचं शिक्षण कमी होतं म्हणून आयुष्यभर आम्ही चूल आणि मूल एवढचं केलं; पण आता शिकलेली सून घरात असताना तिनं बी आमच्यासारखंच राहावं हे काय पटणं, म्हणून तिला शिक्षणाला बाहिर पाठवलं. परीक्षा दिऊन तिनं नोकरी करावी, आम्ही म्हातारी माणसं नातवंडं सांभाळायला सक्षम हाय की.- मंगलाबाई काटकर, कोंडवेपतींचाही सक्रिय सहभागपत्नी नोकरीला लागली तर तिच्या आज्ञात राहावे लागेल, ही पुरुषांची पूर्वीची मानसिकता आता बदलताना दिसत आहे. म्हणूनच पत्नीची परीक्षा सुरू असताना मुलांना सांभाळण्यात दंग असलेले पती बदलत्या सकारात्मक मानसिकतेचे द्योेतक आहेत.सातारा येथे रविवारी पार पडलेल्या टीईटीच्या परिक्षेदरम्यान पहिल्यांदाच सुखद चित्र पहावयास मिळाले. पत्नी परिक्षेत व्यस्त असताना मात्र कोणाचा पती तर कोणाची सासू तर कोणाचा भाऊ लहानग्यांची परीक्षा केंद्राबाहेर पुरेपूर काळजी घेताना दिसून आले.