शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरणात दोघांचा मृत्यू

By admin | Updated: April 23, 2017 21:21 IST

खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा रविवारी दुपारी बुडाल्याने मृत्यू झाला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 23 - खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा रविवारी दुपारी बुडाल्याने मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली़. शनिवारीही एक जण धरणाच्या पाण्यात बुडाला असून, त्याचा शोध लागला नाही. शिरोज ताजउद्दीन नदाफ (वय १९)आणि वाजिद हुसेनअली सय्यद (वय १८ दोघेही रा़ खान वस्ती, वारजे) अशी या मुलांची नावे आहेत. खडकवासला धरणात हे दोघे आपल्या मित्रांबरोबर पोहायला गेले होते. पोहत असताना ते धरणाच्या पाण्यात बुडत असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यांना बाहेर काढण्यात आले. ते बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांना नवले रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. तपासणीअंती ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.शिरोज नदाफ हा १२ वी पास झाल्यानंतर एका खासगी महाविद्यालयात मॅकेनिकलचे शिक्षण घेत होता. वाजिद सय्यद हा सध्या घरीच होता. दोघेही मनमिळावू स्वभावाचे असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले. धरणाच्या एनडीए रस्ता भागात शनिवारी दुपारी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेला एकजण बेपत्ता आहे. जीव देण्यासाठी जातो, असे सांगून तो पळून गेला. अग्निशामक दलाला रविवारी दुपारी माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी शोध घेण्यात आला, तथापि तो आढळला नाही. त्याचे कपडे काठावर होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा शोध घेतला. परंतु, अद्याप त्याचा शोध लागला नसल्याचे अग्निशामक दलाने सांगितले.