शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र बाळगणारे दोघे अटकेत

By admin | Updated: March 3, 2017 02:42 IST

खंडणी व अपहरणाचे गुन्हे दाखल असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

नवी मुंबई : खंडणी व अपहरणाचे गुन्हे दाखल असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यांसह ५ अग्निशस्त्रे व काडतुसे हस्तगत करण्यात आली असून दोघेही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशमधील रहिवासी आहेत. सूरज शरदमन यादव व कृष्णा काशिराम यादव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांना दोन आरोपी अग्निशस्त्रांसह महापे एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली बनसोडे, अविनाश माने यांच्या पथकाने एमआयडीसीतील एल अ‍ॅण्ड टी कंपनीसमोर सापळा रचला होता. या ठिकाणी हे दोघे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्याकडे १ रिव्हॉल्वर, १ पिस्तूल व ३ गावठी कट्टे सापडले आहेत. याशिवाय ८ जिवंत काडतुसेही सापडली आहेत. या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सद्यस्थितीमध्ये उल्हासनगर व टिटवाळा येथे राहणारे असून मूळचे उत्तरप्रदेशमधील सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी सूरज यादवविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खून व अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. कृष्णा यादवविरोधात अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये खंडणी व अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी अग्निशस्त्र कशासाठी आणले होते, अग्निशस्त्राची तस्करी करत आहेत का व या गुन्ह्यांमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का याचीही चौकशी केली जात आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक आयुक्त नितीन कौसाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या कारवाईमध्ये दीपक पाटील, विवेक कठाळे, बाबाजी थोरात, ज्ञानदेव इंगुळकर, विनायक मेळावणे, जितेंद्र पाटील, विनायक कंखरे, जालिंदर गायकर, संतोष मिसाळ, सचिन दहीफळे व इतरांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)