शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

भिवंडीत दोघांचा नरबळी?

By admin | Updated: October 5, 2015 03:42 IST

शहरातील कोकणी कब्रस्तानात काळ्या जादूसाठी दोघांचे बळी घेतल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. इदगाह येथील इन्तेजामिया तकीया अमानीशाह आणि जामा मशीद ट्रस्टच्या कोकणी कब्रस्तानात रविवारी

भिवंडी : शहरातील कोकणी कब्रस्तानात काळ्या जादूसाठी दोघांचे बळी घेतल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. इदगाह येथील इन्तेजामिया तकीया अमानीशाह आणि जामा मशीद ट्रस्टच्या कोकणी कब्रस्तानात रविवारी सकाळी मासे पकडण्यासाठी लागणारे गांडूळ आणण्यासाठी एक जण गेला असता तेथे त्याला दोघे रक्ताच्या थारोळ्यात दिसले. याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तेथे लिंबू, सुया, काळी बाहुली, लोखंडी खिळे याबरोबरच डोक्यात दगड मारून आणि चाकूने भोसकलेला मृतदेह होता. त्याच्याशेजारी असलेल्या पिशवीतून आधारकार्ड, पॅनकार्ड सापडले. त्यावरून तो मुंबई-मानखुर्दचा रहिवासी मिनरूल इलाही शेख (२५) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यापासून १०० फूट अंतरावर आणखी एक जखमी होता. त्याला तातडीने इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री घडली असून, दोघांच्या मृतदेहांशेजारी काळ्या जादूसाठी आणलेले लिंबू, सुया, काळी बाहुली असे साहित्य सापडले. त्यामुळे हे दोन बळी गेले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.