मुंबई : राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला आपल्याला पराभूत करायचे असल्याने शिवसेना-भाजपा या पक्षांनी आपापसातील मतभेद मिटवून एकत्र यावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केले. देशातील काही विधानसभा निवडणुकीतील निकाल पाहता राज्यातील निवडणुका सोप्या नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
आठवले यांनी मंगळवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेने भाजपाला देऊ केलेल्या जागांची व शिवसेनेच्या ‘मिशन 15क् ची माहिती आठवले यांना दिली.आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला पराभूत करणो ही आपली प्राथमिकता आहे. त्यामुळे एक-दोन जागा कमी मिळाल्या तरी कुणीही ताणून धरू नये. देशातील काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर वेगवेगळे लढण्यात कुणाचेच हित नाही हे लक्षात
घेतले पाहिजे. सत्ता समोर दिसत असताना वाद करीत बसलो तर हाता तोंडाशी आलेला सत्तेचा हात गमवावा लागेल. रिपाइंने शिवसेनेकडे सहा तर भाजपाकडे सहा जागांची मागणी केली असली तरी दोन मोठय़ा पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटावा याकरिता आम्ही ताणून धरणार नाही, असे आठवले म्हणाले.
विलासकाकांनी
रिपाइंतून लढावे
काँग्रेसचे आमदार विलासकाका उंडाळकर यांचा कराड-दक्षिण मतदारसंघ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्याकडून हिसकावून घेतला तर विलासकाकांनी रिपाइंच्या तिकीटावर महायुतीतून लढावे, असे आवाहन आठवले यांनी केले.