शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही मंत्र्यांचे माझ्यावर जास्तच प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 00:38 IST

परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : परदेशात जाताना मीच विजय शिवतारे व दिलीप कांबळे या जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना शहराच्या कचरा प्रश्नात लक्ष घालण्याबाबत सांगितले होते. त्यांचे बहुधा ‘जास्त प्रेम’ असावे, त्यामुळे त्यांनी जास्तच लक्ष घातले अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश बापट यांनी कचरा विषयात दोन्ही मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. परदेशातूनही मी या विषयावर लक्ष ठेवून होतो, आता आल्यावर पूर्ण लक्ष देत आहे, असे ते म्हणाले.शहरात कचराप्रश्न पेटला असताना बापट परदेश दौऱ्यावर होते. याबाबत विचारले असता बापट म्हणाले, की कचऱ्यावर प्रक्रिया करणारे लहान प्रकल्प प्रभागांमध्ये सुरू करण्याची कल्पना माझीच होती. आता प्रत्येक प्रभागात असे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कचऱ्यात कागद व प्लॅस्टिक याचे प्रमाण जास्त असते. ते वेगळे केले तरी कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. पुण्यात सध्या तरी पाणी कपातीचा मुळीच विचार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. त्यात फारसा बदल होणार नाही. शेतीसाठीचे आवर्तन सुरू असले तरी त्यातून फार पाणी संपणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. कॅनॉलच्या गळती व अन्य कामांसाठी ५ कोटी रुपयांच्या आतील खर्च करण्यास स्थानिकस्तरावर परवानगी द्यावी, असा प्रस्ताव सरकारला दिला आहे.परदेशात सरकारी खर्चाने गेला नाही असे सांगताना बापट म्हणाले, ‘‘जगातील अनेक देशांचा मिळून एक फंड आहे. त्यातून अशा दौऱ्यांचा खर्च होत असतो. गेली २ वर्षे संसदीय कामकाजमंत्री म्हणून काम पाहत आहे. अन्य देशांमधील या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी दौरा केला. नियोजित दौरा ऐनवेळी रद्द करता येत नाही, त्यामुळेच दोन्ही मंत्र्यांना कचऱ्याच्या समस्येत लक्ष द्या, असे सांगितले होते.’’कचरा डेपोवर कॅपिंगच्या सूचनाफुरसुंगी व उरुळी येथील ग्रामस्थांबरोबरही चर्चा करणार आहे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांचा दूषित पाणी तसेच आरोग्याचा प्रश्न सोडवला जाईल. तेथील डेपोवर कॅपिंग करण्याबाबतही महापालिकेला सूचना दिल्या आहेत. ते कामही होईल. रविवारी (दि. १४) काही कचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देणार आहे. त्यांची कार्यक्षमता वाढवण्याबाबत काय करता येईल, याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे बापट म्हणाले.