शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बीओटी तत्त्वावरची कामे सुरू च राहणार

By admin | Updated: February 8, 2016 04:26 IST

राज्यातील ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर नऊ कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही कामेही सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी

राजरत्न सिरसाट,  अकोलाराज्यातील ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर नऊ कामांना मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही कामेही सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली. मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात ३ लाख कोेटींची रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. येत्या दोन वर्षांत आणखी पाच लाख कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात येतील, असेही ते म्हणाले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३० व्या दीक्षांत समारंंभाला उपस्थिती राहण्यासाठी शुक्रवारी गडकरी अकोला येथे आले असताना, त्यांच्याशी संवाद साधल्यावर खात्यांतर्गत विकास कामांची माहिती खास ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले, ‘नऊ बीओटी प्रकल्पांत सरकारला जागा, तसेच वन पर्यावरणास मंजुरी मिळवून द्यावी लागेल. या कामांत सरकार ४० टक्के तर कंत्राटदार ६० टक्के गुंतवणूक करतील. रस्ते बांधणीचा खर्च संबंधित कंत्राटदाराला व्याजासह परतफेड केला जाईल. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असून, यापुढे अ‍ॅन्युईटी तत्त्वावर रस्ते सुधारणा होईल.’‘सुरुवातीला वाराणसी ते हरदिया जलमार्ग निर्माण करून त्यातून जलवाहतूक सुरू केली जाणार आहे. त्यासाठी पाच अंतर्गत जलवाहतुकीला मान्यता मिळाली आहे. उर्वरित १११ जलमार्ग लोकसभेत मंजूर झाले असून, राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला गती येईल. त्याचा फायदा महाराष्ट्रालासुद्धा होणार आहे,’ अशी माहिती त्यांनी पुढे दिली.