शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बॉश कंपनी देणार रोजगाराभिमुख प्रशिक्षण

By admin | Updated: December 22, 2015 02:04 IST

औद्योगिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील २४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बॉश लिमिटेड या जर्मन कंपनीदरम्यान आज

नागपूर : औद्योगिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, यासाठी राज्यातील २४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बॉश लिमिटेड या जर्मन कंपनीदरम्यान आज सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत ‘ब्रिज’ हा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणार असून, शिक्षण अर्धवट सोडलेल्या युवकांना या प्रशिक्षणाचा फायदा दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले. विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये जसे संवाद कौशल्य, (कम्युनिकेशन स्कील), व्यक्तिमत्त्व विकास, ग्राहक सेवा, स्वयंशिस्त, मुलाखत कौशल्य, औद्योगिक विशेष ज्ञान, इंग्रजी संभाषण कौशल्य, संगणकाची माहिती आदींचा समावेश असलेला दोन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्र मासाठी पाच हजार रु पये शुल्क आकारण्यात येणार असून, त्यापैकी ५०० रु पये उमेदवाराने नोंदणी शुल्क म्हणून भरणे आवश्यक आहे. उर्वरित साडेचार हजार रु पये बॉश कंपनीने करार केलेल्या बँकेमार्फत उमेदवारास कर्ज म्हणून देण्यात येणार आहे. तसेच पहिल्या सहा बॅचसाठी अडीच हजार रु पये किमतीचे लर्नर किटही कंपनीमार्फत देण्यात येणार आहे. जर्मनीतील बॉश ग्रुप कंपनी ही अभियांत्रिकी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि सेवा पुरविणारी जागतिक कंपनी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बॉश कंपनीमध्ये करार करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, नाशिकच्या आमदार सीमा हिरे, अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख, संचालक जे. डी. भुतांगे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली तेव्हा बॉश कंपनीचे महाव्यवस्थापक मोहन पाटील पे्रक्षकदीर्घेत उपस्थित असल्याचा उल्लेख त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)