शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

रेल्वे संरक्षण दलाच्या प्रमुखपदी बोरवणकर?

By admin | Updated: February 27, 2016 03:00 IST

कार्यक्षम महिला आयपीएस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या महासंचालक मीरा बोरवणकर यांची रेल्वे संरक्षण दलाच्या महासंचालक (डीजी आरपीएफ) म्हणून प्रतिनियुक्ती

- जमीर काझी,  मुंबईकार्यक्षम महिला आयपीएस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या महासंचालक मीरा बोरवणकर यांची रेल्वे संरक्षण दलाच्या महासंचालक (डीजी आरपीएफ) म्हणून प्रतिनियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. नियुक्ती झाल्यास त्या रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक ठरतील.‘आरपीएफ’चे सध्याचे प्रमुख राजीव राजन वर्मा सोमवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी बोरवणकर यांच्या प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे, असे अतिवरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बोरवणकर ३० सप्टेंबरपासून कायदा व तंत्रज्ञ (लीगल व टेक्निकल) विभागात महासंचालक आहेत. त्या १९८१ बॅचच्या अधिकारी असून, पुढील वर्षी ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्या रेल्वे संरक्षण दलात (आरपीएफ) प्रतिनियुक्तीवर जाण्यास इच्छुक आहेत. वर्मा २५ एप्रिल २०१५पासून आरपीएफ महासंचालक आहेत. सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारावर बोरवणकर यांची निवड निश्चित असल्याचे मानण्यात येते.पदोन्नती का रखडली?पाच महिन्यांपूर्वी अहमद जावेद यांना मुंबईचे आयुक्त बनविण्यासाठी अपर महासंचालकावरून ‘डीजी’चा दर्जा करण्यात आला. डीजींची ६ पदे मंजूर असताना ७ पदे निर्माण झाली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरला संजीव दयाल सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदाचा दर्जा पदावनत करून ‘एडीजी’चा करण्यात आला. ३१ जानेवारीला जावेद निवृत्त झाल्यानंतर ती धुरा १९८२च्या बॅचचे आयपीएस दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र त्यांना अद्याप डीजीपदावरती पदोन्नती न दिल्याने ते ‘एडीजी’च आहेत. त्यामुळे एसीबीचे कांबळे निवृत्त व बोरवणकर रेल्वेत गेल्यास पहिल्यांदा पडसलगीकर व त्यानंतर पाठक आणि प्रभातरंजन यांचे प्रमोशन करावे लागणार आहे. निर्णयात विलंब झाल्यास निवृत्तीला केवळ एक महिन्याचा अवधी राहिलेल्या पाठक यांची डीजी बनण्याची संधी हुकण्याची शक्यता आहे. जावेद यांच्या मुंबईच्या आयुक्तपदाच्या नियुक्तीसाठी त्याबाबतचे सर्व तांत्रिक सोपस्कार काही तासांत पूर्ण करणारा गृहविभाग २६ दिवस उलटूनही पडसलगीकर यांची पदोन्नती का रखडवत आहे? अशी चर्चा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांत सध्या रंगली आहे. त्याबाबत गृह सचिव के. पी. बक्षी यांच्याशी एसएमएसद्वारे संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदासाठी ‘फिल्डिंग’पुण्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या जागी नियुक्तीसाठी इच्छुक अधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मुख्यालयातील व्ही. डी. मिश्रा, के. एल. बिष्णोई आदींचा क्रम लागतो. एसआयडीच्या प्रमुख रश्मी शुक्ला, एसीबीचे संजय बर्वे, एस. पी. यादव, एटीएसचे विवेक फणसाळकर, अतुलचंद्र कुलकर्णी आदींची नावे चर्चेत आहेत.