श्रीवर्धन : तालुक्यातील दांडगुरी - बोर्लीपंचतन रस्त्यावर खुजारे या गावाच्या हद्दीत भले मोठा झाड रस्त्यात पडल्याने तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. रायगड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र संबंधित विभागाशी संपर्क होऊ शकला नाही. असे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रभाकर खोत यांनी सांगितले. यामुळे कित्येक प्रवाशांना भर रस्त्यान अडकून राहावे लागले होते.एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पोहोचून मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी के ले असताना देखील शनिवारी खुजार येथे रस्त्यात झाड पडल्याने वाहतूक कोलमडली असताना संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क न झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. संबंधित घटनेची माहिती दिघी सागरी पोलीस ठाण्याला मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खोत हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी खुजारे ग्रामस्थांच्या मदतीने झाड तोडून बाजूला केले. झाड रस्त्यातून बाजूला करेपर्यंत तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. (वार्ताहर)
बोर्लीपंचतन रस्त्यावर कोसळले झाड
By admin | Updated: June 27, 2016 02:05 IST