शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

संस्कृत घेतलेल्या विद्यार्थिनीच्या गळ्यात बोर्डाने मारले हिंदी

By admin | Updated: June 9, 2016 03:49 IST

नवी मुंबईतील सेंट अगस्टीन शाळेची विद्यार्थिनी अनुजा कैलास अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले

जितेंद्र कालेकर,

ठाणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील सेंट अगस्टीन शाळेची विद्यार्थिनी अनुजा कैलास अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीने संस्कृत विषय घेतला असतानाही ती हिंदी विषयाची विद्यार्थिनी असल्याचे दाखवून ती परीक्षेला अनुपस्थित राहिल्याने अनुत्तीर्ण झाल्याचा जावईशोध बोर्डाने लावला आहे.अनुजाने आॅनलाइन एसएससीचा निकाल पाहिल्यावर तिला धक्काच बसला. दरवर्षी ९० टक्के गुण मिळवणाऱ्या अनुजाला एसएससीमध्ये एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते. तिला इंग्रजीमध्ये ७५, मराठी ८१, हिंदी- गैरहजर, गणित ९०, सामान्य तंत्रज्ञान ९१ आणि समाजशास्त्र ८६ असे गुण आहेत. मुळात तिने हिंदी विषय घेतलाच नव्हता. ती संपूर्ण १०० गुणांच्या संस्कृत विषयाची विद्यार्थिनी असल्याने तिने त्या विषयाची परीक्षा दिली होती. बोर्डाच्या कार्यालयात चकरा मारल्या असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अनुजा हताश झाली होती.अखेरीस, प्रस्तुत प्रतिनिधीच्या मदतीने अरगडे कुटुंबीयांनी बुधवारी मंडळाचे सचिव जगताप यांची भेट घेतली असता त्यांच्या लक्षात या प्रकरणाचे गांभीर्य आले. या चुकीमागचे कारण शोधून लवकरच संस्कृत विषयाचे गुणही निकालपत्रात अनुजाला मिळतील, असे त्यांनी आश्वस्त केले.परीक्षेपूर्वीच अनुजाच्या परीक्षा प्रवेशपत्रावर (रिसीट) विषयांच्या सूचीत संस्कृतऐवजी हिंदी हा विषय दाखवण्यात आला होता. शिक्षण मंडळाची ही चूक दुरुस्त करण्यासाठी सेंट अगस्टीन शाळेने १६ फेब्रुवारी २०१६ रोजीच तातडीने पत्रव्यवहार केला होता. परीक्षेपूर्वी स्वत:ची चूक दुरुस्त करण्याऐवजी रिसीटवर दाखवल्याप्रमाणे तिच्या गुणपत्रिकेतही हिंदी विषयाचाच उल्लेख करून तिला अनुत्तीर्ण करण्याची महाचूक बोर्डाने केली. ‘‘अनुजाला आतापर्यंत ९० टक्के गुण मिळालेले आहेत. एसएससी परीक्षेत इतर विषयांतही तिला चांगले गुण मिळाले असल्याने हा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. मंडळाकडून आधी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पण, आता सचिवांकडून दुरुस्तीचे आश्वासन मिळाले आहे. प्रवेशासाठी असलेली स्पर्धा आणि निर्धारित वेळ याचे महत्त्व ओळखून मंडळाने ही दुरुस्ती तातडीने करावी, एवढीच अपेक्षा आहे.’’- भारती कैलास अरगडे, अनुजाची आई, नेरळ