शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डीत पर्यटकांची कार खोल समुद्रात अडकली

By admin | Updated: March 21, 2017 03:32 IST

दहिसरहून बोर्डी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात कार खोल समुद्रात घुसवली.

अनिरुद्ध पाटील / बोर्डीदहिसरहून बोर्डी समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात कार खोल समुद्रात घुसवली. ती वाळूत अडकून भरतीच्या पाण्याखाली गेली. पर्यटक प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली. परंतु, भरतीमुळे गाडी दिवसभर पाण्यात बुडालेल्या स्थितीत होती. दुसऱ्या दिवशी ओहोटी लागल्यावर पोलीस व स्थानिकांच्या मदतीने कार जेसीबीच्या मदतीने बाहेर काढली. अरविंद खर्डेश्वर यांच्यासोबत एक पुरु ष, दोन महिला आणि लहान मुलगा अशा पाच व्यक्ती रविवारी कारने बोर्डीला आल्या होत्या. दुपारी नॅशनल शाळेसमोरील समुद्रकिनारा, चौपाटी त्यांनी पाहिली. त्यानंतर त्यांनी कार थेट समुद्राच्या पाण्यात घातली. ती वेळ नेमकी भरतीची होती. मात्र त्यांना ते माहीत नव्हते. भरतीच्या वेळी रेती किनाऱ्यावर लोटली जाते. खाली अत्यंत चिकणमातीच्या चिखलाचा थर जमतो. त्यात ही कार फसली आणि बंद पडली. झपाट्याने वाढणारे भरतीचे पाणी कारमध्ये शिरू लागल्याचे पाहताच आतील सर्व बाहेर आले. किनाऱ्यावरील मंडळींचे सहकार्य मिळेपर्यंत कार मात्र भरतीच्या पाण्यात बुडाली होती.पोलिसांनी झाई आणि बोर्डी येथील स्थानिकांच्या मदतीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चिखलात ती खोलवर रुतल्याने आणि भरती आल्याने सायंकाळी ५च्या सुमारास हे प्रयत्न थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी ८ वाजता कार बाहेर काढली. परगावातील पर्यटक किनाऱ्यावर अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यप्राशन करून पाण्यात पोहणे यामुळे विनाकारण स्वत:चा जीव धोक्यात घालतात. शिवाय असुरक्षित वातावरण निर्माण करतात. अशा वाहनांवर व पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली असून, पर्यटन विकेंड उत्सव काळ आणि पर्यटन हंगाम या काळात जीवरक्षकाची नेमणूक करण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर डहाणूतील घोलवड आणि बोर्डी या किनारी टेहळणी टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र, तेथे जीवरक्षक नाहीत. किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सरुक्षिततेविषयी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी त्याचे पालन मात्र होत नाही.