शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘थेट सरपंच निवडीने विकासाला खीळ’

By admin | Updated: July 15, 2017 05:02 IST

ट लोकांमधून सरपंच निवडण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विकासाच्या मुळावर येणारा आहे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे /नंदुरबार : थेट लोकांमधून सरपंच निवडण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय विकासाच्या मुळावर येणारा आहे. सरपंच एका पक्षाचा व सर्व सदस्य दुसऱ्याच पक्षाचे निवडून आले तर गावांचा विकास कसा साधला जाणार? यामुळे ग्रामविकासाला निश्चितपणे खीळ बसेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे केले. नंदुरबार व धुळे येथे शुक्रवारी आयोजित पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, युवती अध्यक्ष स्मिता पाटील आदी उपस्थित होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना थेट नगराध्यक्ष निवडीचे दुष्परिणाम स्पष्ट झाल्याने आम्ही सदस्यच सरपंच, नगराध्यक्ष व महापौर यांची निवड करतील, अशी व्यवस्था केली होती. तीच या सरकारने मोडीत काढल्याचे पवार म्हणाले. या सरकारची मुदत संपत आली तरी अद्याप प्रश्नांचा अभ्यासच करत आहेत. मग ते हे प्रश्न सोडविणार कधी? कर्जमाफीच्या निर्णयाचा विचका झाला आहे. एकदा निर्णय घेतल्यानंतरही जीआर बदलत आहेत.