शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

होम प्लॅटफॉर्मला बूस्ट

By admin | Updated: January 15, 2015 00:54 IST

नागपूर रेल्वेस्थानकावरील होम प्लॅटफॉर्मवर कुठल्याच सुविधा नसल्यामुळे पांढरा हत्ती ठरला होता. परंतु या प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून येथे प्लॅटफॉर्मचे छत,

कामाला मंजुरी : वॉशेबल अ‍ॅप्रॉन, प्लॅटफॉर्मवर छत टाकणारनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील होम प्लॅटफॉर्मवर कुठल्याच सुविधा नसल्यामुळे पांढरा हत्ती ठरला होता. परंतु या प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून येथे प्लॅटफॉर्मचे छत, वॉशेबल अ‍ॅप्रॉन आणि रेल्वेगाड्यात पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात येत असल्यामुळे या प्लॅटफॉर्मचा चेहरामोहरा बदलणार आहे.होम प्लॅटफॉर्मवर छत नसल्यामुळे पावसाळ्यात दुरांतो एक्स्प्रेसही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात आली. अखेर या प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती ‘डीआरएम’ ओ.पी. सिंह यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दिली. होम प्लॅटफॉर्मवर सध्या १०० मिटरचे छत आहे. दुसऱ्या टप्यात १०० मिटरचे दोन म्हणजे २०० मिटरचे छत टाकण्यात येणार असून त्यासाठी १.४० कोटी रुपये खर्च येणार आहे. होम प्लॅटफॉर्मवर वॉशेबल अ‍ॅप्रॉन नसल्यामुळे रेल्वे रुळावरील घाण साफ करणे गैरसोयीचे होते. येथे २४ कोचच्या वॉशेबल अ‍ॅप्रॉनचे काम होणार आहे. त्यासाठी १.३२ कोटी रुपये खर्च येणार असून या कामाची सुरुवात फेब्रुवारी महिन्यात होईल. होम प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या गाड्यात पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी ४६ लाखाचा खर्च येणार आहे. होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाल्यानंतर दुरांतो एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून सोडण्यात येईल. अनौपचारिक चर्चेला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. सुमंत देऊळकर, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त इब्राहिम शरीफ, जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)