शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रथमच हाडांचे दान, तीन रुग्णांना दिलासा

By admin | Updated: February 21, 2016 02:01 IST

मृत्यूनंतर अवयवदानाचा विचार आता नव्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. चेंबूर येथे मृत्यू झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन तीन

मुंबई : मृत्यूनंतर अवयवदानाचा विचार आता नव्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. चेंबूर येथे मृत्यू झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन तीन रुग्णांची मदत केली. यामध्ये हाडांच्या दानाचाही समावेश असून, कर्करुग्णांना उपचारासाठी सहाय्यदेखील केले. अशा प्रकारे राज्यात पहिल्यांदाच हाडांचे दान करण्यात आले आहे. चेंबूर येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय पुरुषास ११ फेब्रुवारी रोजी छातीत दुखायला लागल्यामुळे सावला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा ईसीजी काढण्यात आला. त्या वेळी त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचे आढळून आले. त्यामुळे रक्त पातळ करण्यासाठी त्यांना इंजेक्शन देण्यात आले. त्याच रात्री त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे ते कोमात गेले आणि हळूहळू मेंदूचे कार्य कमी झाले. १९ फेब्रुवारी रोजी डॉक्टरांनी रुग्ण ब्रेनडेड झाल्याची माहिती दिली. त्या वेळी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे त्यांचे जावई उत्तम आंबोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. उत्तम यांनी सांगितले, ‘रुग्णाची स्थिती सुधारू शकत नाही. कारण मेंदू कार्यरत नाही, असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. वर्तमानपत्रात अवयवदानाविषयी वाचले होते. त्यामुळे सासरे अवयवरूपाने जिवंत राहावेत, म्हणून आम्ही सर्वांनी मिळून अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर रुग्णालयाने सायन आणि केईएम रुग्णालयाशी संपर्क साधला. १९ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सायन रुग्णालयाचे डॉक्टर येऊन सासऱ्यांना सायन रुग्णालयात घेऊन गेले. सर्व तपासण्या झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी यकृत, मूत्रपिंड, डोळे घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही डॉक्टरांना अजून कोणता अवयव दुसऱ्यांना उपयुक्त असल्यास काढून घ्या, असे सांगितले. त्यांनी हाडेदेखील उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यालाही आम्ही मंजुरी दिली.’ कर्करुग्णांच्या उपचारासाठी हाडे उपयुक्त असतात, पण या आधी गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर अथवा अशी अन्य कोणती शस्त्रक्रिया झाल्यावर काढलेली हाडे उपचारासाठी वापरली जातात. हाडांचा कर्करुग्णांना कसा होतो उपयोग? काही कर्करोग रुग्णांसाठी हाडाच्या चुऱ्याचा उपयोग केला जातो. हाडांची पावडर केली जाते. ही पावडर कर्करुग्णांना उपचारासाठी वापरली जाते. आत्तापर्यंत जिवंत व्यक्तींच्या हाडांचा उपयोग केला जातो. उदा. गुडघा प्रत्यारोपण अथवा तत्सम शस्त्रक्रियांमधून मिळणाऱ्या हाडांचा उपयोग केला जातो, असे प्रत्यारोपण समन्वय समितीकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)तिघांना दिलासाया रुग्णाने दान केलेले यकृत ज्युपिटर रुग्णालयातील ६५ वर्षीय महिलेला देण्यात आले. एक मूत्रपिंड सायन रुग्णालयात तर दुसरे जसलोक रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले. यामुळे २६ वर्षीय मुलाला व ३५ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले.