शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बीटी बियाणे जप्त

By admin | Updated: June 11, 2014 01:22 IST

अहमदाबादमधील एका बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्याच्या येथील घरावर धाड घालून कृषी खात्याच्या भरारी पथकाने साडेतीन लाख रुपये किमतीचे बोगस बीटी बियाणे जप्त केले.

अमरावतीचे भरारी पथक : बियाणे कंपनीतील अधिकाऱ्याच्या घरावर धाड यवतमाळ : अहमदाबादमधील एका बियाणे कंपनीच्या अधिकाऱ्याच्या येथील घरावर धाड घालून कृषी खात्याच्या भरारी पथकाने साडेतीन लाख रुपये किमतीचे बोगस बीटी बियाणे जप्त केले. संजय पंढरीनाथ परडखे रा. चांदोरेनगर धामणगाव रोड यवतमाळ असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांच्या मार्गदर्शनात विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जी.टी. देशमुख यांच्या पथकाने आज सकाळी ८ वाजता पोलिसांच्या मदतीने परडखे यांच्या घरी धाड घातली. त्यांच्या घरातून बोगस बीटी बियाण्याचे ३७१ पाकीट जप्त करण्यात आले. त्यात काही लिगल बीटीची पॉकीटेही आढळून आली. मात्र विक्री परवाना नसताना घरात साठेबाजी केल्यावरून ती जप्त केली गेली. या पथकात पुरुषोत्तम कडू, मनोहर पाटेकर, संजय देशमुख हे कृषी अधिकारी तर यादव हांडे, दिलीप अडकिने, आशाताई गोल्हर या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वच तालुक्यात बोगस बीटी बियाण्यांची विक्री सुरू आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. तणनाशक फवारल्यास हे बियाणे व पऱ्हाटी जळणार नाही, असा दावा करून या बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. त्यात काही बियाणे कंपन्यांचे कर्मचारी आणि कृषी केंद्रही सहभागी असल्याचा संशय विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी जी.टी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र आणि अमरावती जिल्ह्यात मोर्शी, वरुड, धामणगाव रेल्वे या तालुक्यांमध्ये बोगस बीटीची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. परडखे यांच्या घरावर दोन दिवसांपासून भरारी पथकाचा वॉच होता. घरात बोगस बियाणे असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात पोलिसांच्या मदतीने धाड घातली गेली. परडखे हे एक्सीस सीडस् अ‍ॅन्ड क्रॉप टेक्नॉलॉजी अहमदाबाद या कंपनीत नोकरीला आहेत. भरारी पथकाचा सर्वच तालुक्यांवर वॉच असून आणखी धाडी घातल्या जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. विशेष असे याच भरारी पथकाने दोन दिवसापूर्वी पुसद येथे धाड घालून ७२ लाख रुपयांचे बोगस बीटी बियाणे जप्त केले होते. यातील आरोपी चंदूलाल राठोड याला जामीन मिळू नये म्हणून कृषी विभाग प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)