शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉम्बे’ नव्हे, मुंबई हायकोर्ट !

By admin | Updated: June 24, 2016 05:03 IST

‘बॉम्बे’ आणि ‘मद्रास’ या दोन उच्च न्यायालयांची नावे बदलून ती अनुक्रमे ‘मुंबई’ व चेन्नई’ अशी करण्याची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

नवी दिल्ली : ‘बॉम्बे’ आणि ‘मद्रास’ या दोन उच्च न्यायालयांची नावे बदलून ती अनुक्रमे ‘मुंबई’ व चेन्नई’ अशी करण्याची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यासंबंधीचा कायदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर होण्याची अपेक्षा आहे.या नावबदलासाठीच्या कायद्याच्या विधेयकाची कॅबिनेट नोट केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने तयार केली असून मंत्रिमंडळाच्या संमतीनंतर हे विधेयक मंजुरीसाठी संसदेत मांडले जाईल, असे या मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.इंग्रजांनी दिलेली नावे बदलून या दोन महानगरांना ‘मुंबई’ व ‘चेन्नई’ ही मूळ देशी नावे अधिकृतपणे देण्यात आल्यानंतर सुमारे २० वर्षांनी उच्च न्यायालयांच्या नावांमध्येही हा बदल होणार आहे. ब्रिटिश राजवटीत ‘प्रेसिडेन्सी टाऊन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई, मद्रास व कोलकाता या तीन शहरांमध्ये ब्रिटिश संसदेने सन १८६१मध्ये केलेल्या ‘इंडियन हायकोर्ट्स अ‍ॅक्ट’ या कायद्यानुसार उच्च न्यायालयांची स्थापना झाली. भारत स्वतंत्र होऊन राज्यघटना अमलात आल्यानंतर हीच न्यायालये घटनात्मक उच्च न्यायालये म्हणून परिवर्तित झाली. अधिकृत इंग्रजी शासन व्यवहारातही ही शहरे मूळ देशी नावांनी ओळखली जाऊ लागली, तरी तेथील उच्च न्यायालयांची इंग्रजी नावे कायम राहिली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)प्रत्येकासाठी स्वतंत्र कायदा

 ‘ओरिसा’ राज्याचे नाव बदलून ‘ओडिशा’ झाले आहे. त्यामुळे तेथील उच्च न्यायालयाचे नावही त्यानुरूप बदलण्याची तेथील जनतेची मागणी आहे.आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन आंध्र व तेलंगण ही दोन राज्ये झाली असली तरी अजूनही दोन्ही राज्यांसाठी एकच आंध्र उच्च न्यायालय आहे. ते हैदराबादमध्ये आहे. कालांतराने हैदराबाद तेलंगणची राजधानी झाल्यावर तेथील उच्च न्यायालयाचे नाव ‘आंध्र उच्च न्यायालय’ राहू शकणार नाही, हे उघड आहे. या नावबदलांसाठीही संसदेत प्रत्येक वेळी वेगळा कायदा करावा लागेल, असे दिसते.कारवाई सुरू : मुंबई आणि चेन्नईच्या बाबतीत असा नामबदल करण्याची औपचारिक मागणी तेथील राज्य सरकारांनी पूर्वीच केलेली होती. आता मुंबई व मद्रास उच्च न्यायालयांच्या सर्व न्यायाधीशांच्या बैठकांमध्ये (फूल कोर्ट मीटिंग) नाव बदलण्यासाठी अनुकूलतेचे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर संसदेच्या कायद्यान्वये या न्यायालयांच्या इंग्रजी नावांमध्ये ‘बॉम्बे’चे मुंबई व ‘मद्रास’चे ‘चेन्नई’ असे बदल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे या सूत्रांनी स्पष्ट केले.