मुंबई : सोमवारी उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला व एकच खळबळ उडाली. काही वेळातच बॉम्बशोधक व नाशक पथक न्यायालयात दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण न्यायालय पिंजून काढले. मात्र पथकाच्या हाती काहीही न लागल्याने हा निनावी फोन अफवा असल्याचे स्पष्ट झाले.मुख्य न्यायाधीश मोहित शहा हे सोमवारी नागपूर खंडपीठात सुनावणी घेण्यासाठी गेले होते. न्यायालयाचे कामकाज प्रभावित न होता शोध घेण्याचे निर्देश वरिष्ठ न्यायाधीश म्हणून विजया कापसे-ताहिलरमानी पोलिसांना दिले. न्या. व्ही.एम. कानडे व न्या. बी.पी. कुलाबावाला यांनी काही वेळासाठी कामकाज थांबवले. तिथे गोमांस हत्या बंदीविरोधातील याचिकेची सुनावणी सुरू होती. (प्रतिनिधी)
हायकोर्टात बॉम्बची अफवा
By admin | Updated: August 11, 2015 02:13 IST