शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बम्बार्डियरची चाचणी यशस्वी

By admin | Updated: January 15, 2015 05:28 IST

उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत लवकरच नव्याने येणाऱ्या बम्बार्डियर लोकलची अखेरची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून बुधवारी घेण्यात आली.

मुंबई : उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत लवकरच नव्याने येणाऱ्या बम्बार्डियर लोकलची अखेरची चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून बुधवारी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले. त्यामुळे ही लोकल धावण्यास कुठलीच अडचण नसल्याची माहितीही त्यांनी दिली. यावर रेल्वे बोर्डाकडून शिक्कामोर्तब होणे आवश्यक आहे. एमआरव्हीसीमार्फत बम्बार्डियर कंपनीच्या ७२ लोकल मुंबईच्या उपनगरीय प्रवाशांसाठी येणार आहेत. या सर्व लोकलची बांधणी चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरी) केली जात आहे. ७२ पैकी दोन लोकल २0१३ च्या आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दाखल झाल्या. या दोन्ही लोकलची रेल्वे अधिकाऱ्यांकडून चाचणी घेण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेवर २0१४ च्या मार्च, एप्रिल, मे, जुलै, सप्टेंबर, आॅक्टोबर, जानेवारी महिन्यात सुरू करण्यासाठी मुहूर्त निवडण्यात आले. मात्र काही तांत्रिक अडचणी येत असल्याने आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून शेवटची चाचणी होणे बाकी असल्याने हे मुहूर्त पुढे ढकलण्यात आले. अखेर बुधवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी चर्चगेट ते बोरीवली जलद आणि बोरीवली ते चर्चगेट धीम्या मार्गावर बम्बार्डियर लोकलची चाचणी घेतली. ही चाचणी घेतानाच लोकलचा वेग, प्लॅटफॉर्म आणि लोकलमधील गॅप आणि अन्य तांत्रिक चाचण्यांची माहितीही या वेळी घेण्यात आली. याबाबत बक्षी यांना विचारले असता, ही चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे बम्बार्डियर लोकल धावण्यास कुठलीच अडचण नाही. मात्र रेल्वे बोर्डाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे येणे बाकी असून, तोपर्यंत या चाचणीचा अहवाल बनविला जाईल आणि तो नंतर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. त्यांच्या मंजुरीनंतरच ही ट्रेन सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेवर अवलंबून असेल. (प्रतिनिधी)