शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ल्यांचा धोका

By admin | Updated: October 25, 2014 08:32 IST

एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट वा आत्मघाती हल्ल्यात उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी उघड केल्याच्या पार्श्‍वभूमीवर या तिन्ही विमानतळांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 सुरक्षा यंत्रणा सतर्क : मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवर रेडअलर्ट

मुंबई/अहमदाबाद/कोची : एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोट किंवा आत्मघाती हल्ल्यात उडवून देण्याचा धोका गुप्तचर यंत्रणांनी गोपनीय माहितीच्या आधारावर उघड केल्याच्या पार्श्‍वभूमीवर या तिन्ही विमानतळांवर रेड अलर्ट जारी करीत चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मुंबई- कोची तसेच अहमदाबाद-मुंबई या क्षेत्रात एअर इंडियाच्या विमानाला धोका असल्याची माहिती कोलकात्याहून मिळाली असल्याचे कोची येथील विमानतळ संचालक ए.के.सी नायर यांनी सांगितले. आत्मघाती बॉम्बर्स एअर इंडियाच्या दोन विमानांमध्ये चढण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा नवी दिल्लीतील नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाकडून एका पत्रात देण्यात आला.२४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा २५ ऑक्टोबरच्या सकाळी अहमदाबादहून मुंबईला तसेच पहाटे ५ वाजता कोचीहून मुंबईला जाणार्‍या विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते. प्रत्येक विमानात वेगवेगळा सुसाईड बॉम्बर असेल. त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर विमान उड्डाणांना परवानगी द्यावी, असे या पत्रात म्हटले होते. धोका लक्षात घेता या दोन तारखांना अहमदाबाद, मुंबई विमानतळांवरील सर्व विमानांची सुरक्षा वाढविली जाईल. अहमदाबादचे नागरी विमान वाहतूक प्रादेशिक उपायुक्तांनी २२ ऑक्टोबर रोजी या पत्राची प्रत संबंधित अधिकार्‍यांना दिली.याआधीच विमानतळांभोवती चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रवाशांची कसून चौकशी करण्यासह विमानतळावरील प्रवेशाबाबतही चांगलीच छाननी होत आहे. अपहरणप्रतिबंधक पथकांनाही सतर्क करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी गुजरातमध्ये नववर्ष साजरे करण्यात आले तर २५ ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी होत आहे.आयसीस-अल-कायदाची हातमिळवणीभारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी आयसीस आणि अल-कायदा या दोन संघटनांनी हातमिळवणी केल्याची माहिती मिळाली आहे. गेल्याच महिन्यात अल-कायदाने भारतात शाखा उघडण्याची घोषणा केली. या संघटनेचा प्रमुख आयमन अल जवाहिरी याने व्हिडिओही जारी केला होता.दिवाळीच्या आनंदावर विरजणसुरक्षा यंत्रणतेतील जवान दिवाळी साजरी करण्याच्या मन:स्थितीत असतानाच हल्ल्यांबाबत सावधगिरीचा इशारा देण्यात आल्यामुळे मुंबई, अहमदाबाद, कोची विमानतळांवरील अधिकार्‍यांना धक्का बसला.सतर्कतेच्या इशार्‍यानंतर तिन्ही विमानतळांवरील संपूर्ण यंत्रणा सुरक्षा बंदोबस्ताला लागली.(लोकमत न्यूज नेटवर्क)