शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

इफेड्रीन प्रकरणात बॉलीवूडचा हास्यअभिनेता

By admin | Updated: July 2, 2016 04:30 IST

इफेड्रीन ड्रग्ज प्रकरणात एक हास्यवीर अभिनेता असल्याचे काही पुरावे ठाणे पोलिसांच्या हाती लागले

ठाणे : इफेड्रीन ड्रग्जप्रकरणी मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत आरोपी किशोर राठोड, जय मुखी यांच्यासोबत बॉलीवूडमधील एक हास्यवीर अभिनेता उपस्थित असल्याचे काही पुरावे ठाणे पोलिसांच्या हाती लागले आहे. मात्र, ठोस पुरावे नसल्याने त्याचे नाव गुलदस्त्यात ठेवून संबंधित हॉटेलमधील त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे, अशी मागणी ठाणे पोलिसांनी त्या हॉटेलवाल्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.याचदरम्यान, विकी गोस्वामीच्या बहिणीच्या खात्यात अभिनेत्री ममता कुलकणीच्या खात्यातून २ कोटी रुपये पाठवण्यात आल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस तपासात इफेड्रीनप्रकरणी नवनवीन गोष्टी पुढे येत आहेत. यामध्ये आणखी काही गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यामध्ये मध्यंतरी मुंबई जुहूतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इफेड्रीनप्रकरणी एक बैठक झाली होती. त्याबाबतचे काही पुरावे ठाणे पोलिसांच्या हाती लागले. याचदरम्यान, या बैठकीत जय मुखी आणि फरार आरोपी किशोर राठोड याच्यासह एक हास्य अभिनेता उपस्थित होता. त्यामुळे ज्या वेळी बैठक झाली, त्या वेळचे त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची मागणी ठाणे पोलीस संबंधित हॉटेलवाल्यांकडे करताच, त्यांनी हॉटेलमध्ये फारफार तर एक महिन्याचे फुटेज मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. हा अभिनेता १९९७ साली दुबईत झालेल्या विकी गोस्वामी याच्या कार्यक्रमास हजर राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) >राठोड कुटुंबीयांची चौकशी सुरूपोलिसांच्या रडारवर असलेल्या किशोर राठोड यांच्या आईवडील, बहीण आणि पत्नी यांच्यासह १५ जणांना ठाणे पोलिसांनी नोटीस बजावून चौकशीला हजर राहण्यास बजावले आहे. त्यानुसार, किशोरचे आईवडील, पत्नी आणि बहिणीची चौकशी सुरू आहे. उर्वरितांमध्ये त्याचे काही नातेवाईक, मित्रमैत्रिणींचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विकीच्या बहिणीचे खाते गोठवलेविकी गोस्वामी याची गुजरात येथे राहणारी रीटा बेन-गोस्वामी (५२) हिच्या एका बँक खात्याच्या तपासणीत तिच्या खात्यावर मागील काही वर्षांपासून ममता कुलकर्णी हिच्या खात्यातून जवळपास दोन कोटी रुपये असल्याचे समोर आले. त्यानंतर, पोलिसांनी तिचे ते बँक खाते गोठवले आहे. तसेच तिलाही नोटीस बजावून चौकशीस हजर राहण्यास सांगितल्याची सूत्रांनी दिली.