शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा लॅबचालक ठरणार ‘बोगस डॉक्टर’

By admin | Updated: May 25, 2016 02:31 IST

राज्यात डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (डीएमएलटी) अथवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्ती स्वतंत्रपणे बेकायदा पॅथॉलॉजी लॅब चालवत आहेत. सुमारे ५ हजार

मुंबई : राज्यात डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (डीएमएलटी) अथवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्ती स्वतंत्रपणे बेकायदा पॅथॉलॉजी लॅब चालवत आहेत. सुमारे ५ हजार बेकायदा पॅथॉलॉजी लॅबनी गल्लोगल्ली ‘निदानाचा काळाबाजार’ मांडला आहे. आता या बेकायदा लॅब चालकांवर ‘बोगस डॉक्टर’ म्हणून कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी घेण्यात आला. ‘लोकमत’ने जानेवारी २०१५ मध्ये ‘स्टिंग आॅपरेशन’ करून बेकायदा पॅथॉलॉजी लॅबचा विषय समोर आणला होता. त्यानंतर दीड वर्षे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मंगळवारी घेतलेल्या निर्णयानुसार ‘वैद्यक व्यवसाय’ ही संज्ञा स्पष्ट करण्यात आली आहे. त्याचबरोबर पॅथॉलॉजिस्ट हेदेखील वैद्यक व्यावसायिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डीएमएलटी पदविका अथवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेली व्यक्ती या पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टच्या साहाय्यकाच्या भूमिकेत काम करू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यक्ती तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांचे स्वत: विश्लेषण करू शकतात आणि त्याच्या निकालाच्या नोंदी घेऊ शकतात. पण नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टची नेमणूक न करता, स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवू शकत नाहीत. याआधी २६ जुलै २००८ आणि २३ सप्टेंबर २०११ मध्ये दोन शासकीय पत्रे काढण्यात आली होती. पण त्या पत्रांमध्ये कारवाईचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नव्हता. मंगळवारच्या शासन निर्णयात, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद आणि भारतीय वैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणी असलेल्या पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली तपासण्या करणे आणि तपासणी अहवाल देणे अभिप्रेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टच अहवाल प्रमाणित करू शकतो, असेही म्हटले आहे. या निर्णयामुळे राज्यात सुरू असलेल्या बेकायदा पॅथॉलॉजी लॅबना आळा बसणार आहे. गेल्या १० वर्षांपासून महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटना या विषयाचा पाठपुरावा करत होती. या निर्णयामुळे संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि आमदार विजय गिरकर यांचे आभार मानले आहेत. संज्ञा स्पष्ट झाली‘लोकमत’ने जानेवारी २०१५ मध्ये ‘स्टिंग आॅपरेशन’ करून बेकायदा पॅथॉलॉजी लॅबचा विषय समोर आणला होता. मंगळवारी घेतलेल्या निर्णयानुसार ‘वैद्यक व्यवसाय’ ही संज्ञा स्पष्ट करण्यात आली आहे.