लातूर : बोगस डिग्री देणाऱ्या रॅकेटचा अहमदनगर येथील म्होरक्या नीळकंठ नामदेव मिसाळ एमआयडीसी पोलिसांना सोमवारी सकाळी शरण आला. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला पाच हजारांत नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सची बोगस पदवी बी़ आऱ वाडकर यांनी दिली होती़ ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमुळे बोगस पदव्या देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला़ बी़ आऱ वाडकर यास अटकही झाली़ वाडकरने पोलीस तपासात मी हे प्रमाणपत्र नीळकंठच्या महाराष्ट्र कौन्सिल आॅफ मेडिकल अँड पॅरामेडिकल या संस्थेतून बनवून घेतल्याचे सांगितले.
बोगस डिग्री रॅकेटचा म्होरक्या पोलिसांना शरण
By admin | Updated: September 3, 2015 00:50 IST