शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नववीच्या पुस्तकात बोफोर्स प्रकरणाचा उल्लेख, काँग्रेस आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 14:11 IST

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने छापलेल्या नववीच्या पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात बोफोर्स प्रकरणाचा उल्लेखयानंतर कॉंग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली आहेनागपूरमध्ये युवक काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे

मुंबई, दि. 28 - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने छापलेल्या नववीच्या पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे.  नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर कॉंग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूरमध्ये युवक काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. काय म्हटलंय या पुस्तकात-या पुस्तकात राजीव गांधी यांच्याबाबत माहिती देताना, संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधींवर बरीच टीका झाली असं म्हटलं आहे. त्यानंतर राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांमध्ये महत्तवाचा मुद्दा बनला आणि निवडणुकामध्ये काँग्रेसचा पराभव झाला, असं या पुस्तकात म्हटलं आहे. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्रीपदावर राहू शकले नाहीत. 1990 मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले. 1991 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे (LTTE) या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली.

काय आहे बोफोर्स प्रकरण-

1987 मध्ये ‘बोफोर्स’ प्रकरण उघडकीस आले होते. राजीव गांधींच्या काळात बोफोर्स तोफांच्या आवाजांनी देश दणाणला होता. राजीव गांधी यांचेच सहकारी आणि माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफोर्स तोफा खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. बोफोर्सच्या व्यवहारात 64 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी बोफोर्स तोफा खरेदी व्यवहारासंबंधी असे निश्चित करण्यात आले की, या व्यवहारात दलाली करणारे क्वात्रोची आणि विन चड्डा यांना संसदेत बोलवावे, परंतु संसदेमध्ये आणण्यापूर्वीच त्यांनी भारतातून पलायन केले होते.

भारताच्या संरक्षण विभागातील सर्वात मोठा आणि सर्वात गाजलेला घोटाळा म्हणून बोफोर्स घोटाळ्याकडे पाहिले जाते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत पाच वेळा जेपीसी नेमण्यात आली आहे. यातील सर्वात पहिली जेपीसी 1987 मध्ये बोफोर्स घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आली होती. तर, शेवटची आणि पाचवी जेपीसी ही 2 जी स्पेक्ट्रमसाठी नेमण्यात आली आहे.

तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून बोफोर्स खटला भारतात सुरु होता. मात्र भारतातून पलायन केलेला क्वात्रोची एकदाही न्यायालयासमोर हजर झाला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणा-या केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने ऑक्टोबर 2009 मध्ये न्यायालयात क्वोत्रोचीवरील खटला बंद करण्यासाठी अर्ज सादर केला होता.