शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

दोन वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत आढळला

By admin | Updated: June 30, 2016 21:59 IST

तालुक्यातील टेंभूर्णा शिवारातील विहिरीत दोन वर्षाच्या अनोळखी चिमुकल्याचा मृतदेह गुरुवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाबाबत पोलिसांनी

खामगाव : तालुक्यातील टेंभूर्णा शिवारातील विहिरीत दोन वर्षाच्या अनोळखी चिमुकल्याचा मृतदेह गुरुवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाबाबत पोलिसांनी खूनाचा संशय व्यक्त केला आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील टेंभूर्णा शिवारात राहूल खंडेलवाल यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीत सायंकाळच्या सुमारास दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत बकऱ्या चारणाऱ्या इसमास दिसून आला. याबाबत टेंभूर्णा पोलिस पाटलाने घटनास्थळी पाहणी केली व खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रुपाली दरेकर, पोलिस निरीक्षक सचिंद्र शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निकुंभ, पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे, बबनराव कटारे, सचिन लोंढेकर, संतोष गव्हाळे, प्रविण गवई, रतन गिरी आदी पोलिसांचा ताफा त्वरित घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी मृत बालकाचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. त्यानंतर या चिमुकल्याचा मृतदेह स्थानिक सामान्य रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. निर्दयतेचा कळस..विहिरीतून बाहेर काढलेल्या चिमुकल्याच्या मृतदेहाची पाहणी केली असता या चिमुकल्याचे दोन्ही पाय दोरानी बांधलेले दिसून आले. त्याचप्रमाणे कमरेला दगड बांधून एका कापडामध्ये गुंडाळलेला सदर मृतदेह आढळून आला. त्यामुळे या चिमुकल्याला जिवाने मारण्याचाच बेत आखण्यात आला होता असे दिसून येत आहे.